Narendra Modi and sonia Gandhi Narendra Modi and sonia Gandhi
देश

सोनिया गांधींचा PM मोदींना टोमणा, म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

काही वर्षांपूर्वी मनरेगा योजनेची अनेकांनी खिल्ली उडवली होती. परंतु, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाला तेव्हा कोट्यवधी गरिबांना वेळेवर मदत करण्याचे काम मनरेगाने केले. सरकारला वाचवण्यात सकारात्मक भूमिका बजावली, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी (ता. ३१) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव न घेता खिल्ली उडवली.

मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे. त्याची मजुरी कामाच्या १५ दिवसांच्या आत कामगारांच्या खात्यात पोहोचली पाहिजे. काही विलंब झाला तर भरपाई करावी. मनरेगा योजनेतील भ्रष्टाचाराकडेही सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारांना सांगितले पाहिजे की, जोपर्यंत सामाजिक लेखापरीक्षण होत नाही तोपर्यंत त्यांच्या वार्षिक योजनांना मंजुरी दिली जाणार नाही. मनरेगा योजनेच्या कामांचे लेखापरीक्षण करण्यासाठी लोकपाल नियुक्त करावे, असे सोनिया गांधी (sonia Gandhi) म्हणाल्या.

या योजनेचे सोशल ऑडिट व्हायला हवे. मात्र, गरीब मजुरांची देणी थांबवून त्यांना शिक्षा करू नका, असेही सोनिया गांधी (sonia Gandhi) म्हणाल्या. यूपीए सरकारच्या या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीच्या टप्प्यात टीका केली होती. मात्र, त्यानंतर ही योजना सातत्याने सुरू राहिली आणि कोरोनाच्या काळात लोकांना गावोगावी तत्काळ रोजगार मिळू शकला. विशेषत: यूपी आणि बिहारमध्ये या योजनेने कोरोनाच्या काळात गरिबांना मदत करण्याचे काम केले.

मनरेगा हे यूपीएच्या अपयशाचे स्मारक

मनरेगा हे तुमच्या अपयशाचे जिवंत स्मारक आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही हीच परिस्थिती असेल, तर काँग्रेसने (Congress) गरिबी हटवण्यासाठी कसे काम केले, हे दिसून येते. तुम्ही लोकांना खड्डे खणायला लावता आणि त्या बदल्यात त्यांना पैसे देता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले होते. मी ही योजना बंद करणार नाही, ती उत्साहाने सुरू ठेवणार आहे, असेही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT