BSF esakal
देश

BSF च्या ताफ्यात 3 नव्या जहाजांचा समावेश, सागरी सीमांचे संरक्षण होणार मजबूत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एकीकडे बुधवारी देशात ७३ वा प्रजासत्ताक दिन (republic day) मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे भारताच्या सीमा सुरक्षा दलात (BSF) 3 नवीन फ्लोटिंग बॉर्डर आउट-पोस्ट जहाजांचा ताफा (बीएसएफ) सामील करण्यात आला. कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने बीएसएफसाठी 9 फ्लोटिंग बॉर्डर आउट पोस्टपैकी 3 जहाजे त्यांना समर्पित केली आहेत, असे बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले. नवीन जहाजांच्या ताफ्यात समावेश झाल्याने देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.

समुद्रात गस्त घालताना मोठी मदत

एका वरिष्ठ बीएसएफ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, सागरी सीमांचे रक्षण करणे (एफबीओपी) जहाजे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण ते समुद्रात असताना सीमा चिन्हांकित करण्यात मदत करतात. ही जहाजे समुद्रात गस्त घालताना मोठी मदत करतील आणि लहान बोटींना पेट्रोल, पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी मदत करतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, ते भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तैनात केले जातील

जमीन आणि समुद्र सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील

खर तर, स्वदेशी बनावटीची FBOP जहाजे भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर धोरणात्मक बेस स्टेशन म्हणून काम करतील. ही जहाजे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत आणि देशाच्या किनारी आणि आंतर्देशीय जलमार्गांद्वारे व्यापाराला चालना देण्यासाठी देखील मदत करतील. कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने BSF ला तीन FBOP जहाजे पुरवली आहेत, जी भारत-पाकिस्तानच्या 3,323 किमी आणि भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेच्या 4,096 किमी अंतरावर जमीन आणि समुद्र सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

तीन जहाजांचा ताफा बीएसएफकडे सुपूर्द

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला तीन जहाजांचा ताफा बीएसएफकडे सुपूर्द करण्यात आला होता आणि पुढील तीन जहाजांचा ताफा लवकरच बीएसएफकडे सुपूर्द केला जाईल. FBOP जहाजांच्या समावेशामुळे, BSF च्या जहाजांच्या ताफ्याचे संख्याबळ आता 12 वर पोहोचले आहे. ही जहाजे CSL द्वारे डिझाइन केलेली आहेत आणि भारतीय शिपिंग नोंदणीद्वारे वर्गीकृत केली आहेत. प्रत्येक FBOP चार जलद गस्ती नौकांसाठी स्टोरेज सिस्टमसह डिझाइन केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT