Constitution Day 2022 Narendra Modi esakal
देश

Constitution Day : जग भारताकडं मोठ्या अपेक्षेनं पाहतंय, यामागील सर्वात मोठी शक्ती आपलं संविधान आहे - PM मोदी

संविधानामुळं आज देशातील गरीब आणि महिला सशक्त झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

संविधानामुळं आज देशातील गरीब आणि महिला सशक्त झाल्या आहेत.

नवी दिल्ली : संविधान दिनाच्या (Constitution Day 2022) सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झाले आहेत.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संविधानामुळं आज देशातील गरीब आणि महिला सशक्त झाल्या आहेत. भारत आज सर्वच अडचणींना मागं टाकून पुढं जात आहे. तरुणांना देशाचं संविधान माहित असणं आवश्यक आहे. जेव्हा त्यांना ते कळेल तेव्हा त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान पुढं म्हणाले, आजच्या जागतिक परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडं लागल्या आहेत. भारताची झपाट्यानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि तिची मजबूत जागतिक प्रतिमा यामुळं जग आपल्याकडं मोठ्या अपेक्षेनं पाहत आहे. यामागील सर्वात मोठी शक्ती आपली राज्यघटना आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आजच्या दिवशी मुंबईत २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला होता. याच स्मरण करुन मोदी म्हणाले, 14 वर्षांपूर्वी भारत आपली राज्यघटना आणि नागरिकांच्या हक्कांचा उत्सव साजरा करत होतं, तेव्हा मानवतेच्या शत्रूंनी भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, अशी त्यांनी आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम ई-कोर्ट प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल जस्टिस क्लॉक, डिजिटल कोर्ट आणि जस्टिस मोबाईल अॅप 2.0 लाँच करण्यात येणार आहे. 1949 च्या या दिवशी स्वतंत्र भारतानं स्वत:साठी नवीन भविष्याचा पाया रचला होता, असं पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर सांगितलं.

देशाला संविधान देणाऱ्या महान व्यक्तींना अभिवादन - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्पूर्वी एका ट्विटमध्ये संविधान देणाऱ्या महान नेत्यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्रासाठी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 2015 पासून संविधान सभेनं भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यापूर्वी हा दिवस कायदा दिन म्हणून साजरा केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT