National Herald Case Sakal
देश

National Herald case : 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणी राहुल अन् सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ होणार?; 'ED'ने टाकलं मोठं पाऊल!

ED steps up action in the National Herald case: ७ ऑगस्ट रोजी न्यायालयाने गांधी कुटुंबाच्या भूमिकेवर तपास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले होते, तर यापूर्वी कागदपत्रांची स्पष्टताही मागितली होती.

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi and Sonia Gandhi in National Herald Case:  नॅशनल हेराल्ड प्रकरणात आता काँग्रेसेचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहे आहेत. कारण, या नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात EDने राऊस अव्हेन्यू  स्थित विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सादर केली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्व प्रस्तावित आरोपींना हे कागदपत्रे शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. ईडीकडून उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी २०१४ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली तक्रार आणि ३० जून २०२१ रोजीचे एक कागदपत्रं न्यायालयात सादर केले आहेत आणि ही दोन्ही कागदपत्रे रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आली होती.

७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयाने गांधी कुटुंबाच्या भूमिकेवर तपास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले होते, तर यापूर्वी न्यायालयाने कागदपत्रांची स्पष्टताही मागितली होती. ईडीने असा युक्तिवाद केला होता की काँग्रेस देणगीदारांची दिशाभूल केली होती आणि काहींना निवडणुकीच्या तिकिटांचे आश्वासनही देण्यात आले होते. तसेच, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) वर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही किंवा एजेएल नॅशनल हेराल्डचा मूळ प्रकाशक होता, असा गांधी कुटुंबाचा दावाही ईडीने फेटाळून लावला आहे.

 तर दुसरकीडे राहुल गांधी यांच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील आर.एस. चीमा यांनी या प्रकरणात असा युक्तिवाद केला की, काँग्रेसचा एजेएल विकण्याचा कोणताही हेतू नव्हता, उलट स्वातंत्र्यलढ्यातील वारसा म्हणून ते जतन करण्याचा त्यांचा उद्देश होता. तसेच, एजेएलच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनकडे ईडीने का दुर्लक्ष केले?, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की त्यांची धोरणे काँग्रेसशी जोडलेली आहेत. असा सवालही चीमा यांन केला आहे.

याशिवाय, सोनिया गांधी यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील मनु सिंघवी यांनी ईडीच्या कारवाईला अनपेक्षित आणि धक्कादायक म्हटले आणि सांगितले की यंग इंडियन कंपनीचे एकमेव उद्दिष्ट एजेएलच्या थकित कर्जाची कायदेशीररित्या सोडवणूक करणे आहे. याचबरोबर त्यांनी असा आरोपही केला आहे की, वैयक्तिक तक्रारीच्या आधारे अनेक वर्षांनंतर हा खटला पुन्हा सुरू करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT