naveen patnaik
naveen patnaik 
देश

नवीन पटनाईक यांच्यावर ओडिशात चप्पलफेक 

स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर एका युवकाने चपला भिरकावल्या. मात्र, ते त्यातून बचावले. त्यांच्या सुरक्षारक्षकाला मात्र चपलेचा फटका बसला. 

सुरक्षा जवानांनी संबंधित युवकाला लगेच ताब्यात घेतले. त्याचे नाव कार्तिक मेहेर असे असून, तो बारागड जिल्ह्यातील पद्‌मापूर या गावाचा रहिवासी असल्याचे कळते. 
बिजेपूर पोटनिवडणुकीतील बिजू जनता दलाच्या (बीजेडी) उमेदवार रिटा साहू यांच्या प्रचारासाठी आलेल्या पटनाईक यांची सभा संपत आली असताना ही घटना घडली.

बारागडजवळच्या कुंभेरी येथे ही सभा होती. पटनाईक यांचे भाषण संपत आले असताना समोरच्या रांगेत बसलेल्या कार्तिकने त्यांच्या दिशेने चपला भिरकावल्या. संतप्त नागरिकांच्या मारहाणीत कार्तिक गंभीर जखमी झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताबडतोब बारपाली रुग्णालयात नेले. तेथून त्याला बुर्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या कृत्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप "बीजेडी'चे आमदार देवेश आचार्य यांनी केला आहे. भगवा पक्षच अशी गुंडगिरी करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, भाजपचे आमदार प्रदीप पुरोहित यांनी या आरोपाचा इन्कार केला असून, ह घटना म्हणजे सध्याच्या बीजेडी सरकारविरुद्ध जनतेने व्यक्त केलेला असंतोष असल्याचे म्हटले आहे. या आधी बालोसरमध्ये या वर्षीच्या 31 जानेवारीला एका महिलेने पटनाईक यांच्यावर अंडी भिरकावली होती. ही महिला एका स्थानिक भाजप कार्यकर्त्याची पत्नी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT