Naveen Shekharappa death
Naveen Shekharappa death Naveen Shekharappa death
देश

युक्रेनमधून मृतदेह आणण्यावरून भाजप आमदार म्हणाले, एका मृतदेहाऐवजी...

सकाळ डिजिटल टीम

रशियाने १ मार्च रोजी युक्रेनवर केलेल्या गोळीबारात नवीन शेखरप्पा (Naveen Shekharappa) या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ठार झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपच्या आमदाराचे वादग्रस्त विधान केले आहे. ‘एका मृतदेहाऐवजी विमानात आठ जण बसू शकतात’ असे मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कर्नाटकचे भाजप आमदार अरविंद बेलाड म्हणाले. बेलाड हे उत्तर कर्नाटकातील भाजप नेते आहेत. नवीन हा याच भागातील आहे.

नवीनचा मृतदेह युक्रेनमधून (ukraine) परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्या देशात युद्ध सुरू असल्याने तेथील लोकांना जिवंत आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे. विमानात मृतदेह आणण्यासाठी अधिक जागा लागते. मृतदेहासाठी आवश्यक असलेल्या जागेत आठ लोक बसू शकतात आणि त्यांना परत आणता येऊ शकते, असे बेलाड म्हणाले.

शासकीय बाजूने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. युद्ध सुरू आहे. त्यामध्ये प्रयत्न केले जातील आणि शक्य झाल्यास मृतदेह परत आणला जाईल. जे जिवंत आहेत त्यांना आणणे अवघड आहे. त्यामुळे मृतदेह परत आणला अधिक कठीण झाले आहे. विमानात मृतदेह आणण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते. तेवढ्या जागेत आठ जणांना बसवून परत आणता येईल, असेही बेलाड म्हणाले.

नवीनच्या कुटुंबीयांना आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कुटुंबीयांशी बोलून नवीनचा (Naveen Shekharappa) मृतदेह आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. त्यांचे वडील शेखरप्पा यांनी पंतप्रधान मोदींशी बोलताना युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परत आणण्याचे आवाहन केले. मात्र, अद्याप मृतदेह सापडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळालेली नाही.

प्रल्हाद जोशी यांनीही केले होते विधान

भाजप आमदाराची ही वादग्रस्त टिप्पणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विधानानंतर आली आहे. जोशी म्हणाले होते की, वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणारे ९० टक्के विद्यार्थी भारतीय प्रवेश परीक्षा पास करू शकत नाहीत. मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT