navneet rana sakal
देश

कोर्टाच्या नोटीसीनंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) राणा दाम्पत्यांना (Navneet Rana Ravi Rana) सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. पण, त्यांनी माध्यमांसोबत बोलून अटींचं उल्लंघन केलंय, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टात करत आता न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Navneet Rana Reaction After Court Notice)

नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या की, आम्ही कोर्टाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नाही. तसेच टीकेला उत्तर देणं हा आमचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले आहे. आमच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारते वक्तव्य केलेले नसल्याचेही राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुरुंगात असताना आणि एकूण झालेल्या गोष्टींवर भाष्य करण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. त्यानुसार मी भाष्य केलं आहे. जर दुसऱ्यांच्या हक्कासाठी मी लढत असेल. तर, मी माझ्या स्वतःच्या हक्कासाठी तर लढूच शकते असे राणा यांनी सांगितले. कोर्टाने दिलेली नोटीस अद्याप पाहिलेली नसून, कोर्टाने जे काही प्रश्न विचारले आहेत. त्याचा मान ठेवत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे लीगल टीम देईल असे त्या म्हणाल्या.

आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गुन्हा नसताना अटक होईल तेव्हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुःख होईल असे नवनीत राणा यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंना नौतिकतेचा भाषा करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रामचे नाव घेण्यासाठी आयुष्यभर जरी मला कुणी तुरुंगात टाकणार असेल तर आपण जाण्यास तयार आहे. देवाच्या नावावर तुरुंगात जाणारी पहिली महिला असल्याचा गर्व असल्याचेही यावेळी राणा म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT