देश

मरकज प्रकरणी तीन न्यूज चॅनेल्सना शिक्षा; NBSA कडून कारवाई

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोनाचा हाहाकार देशात 2020 मध्ये सुरु झाला. हा काळ असा होता की नुकताच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि लोकांच्या मनात या नव्या रोगाविषयी अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं होतं. एकीकडे हा विषाणू आणि त्याविषयाची चर्चा संपूर्णपणे नवी असताना दुसरीकडे दिल्लीमधील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम मरकज चर्चेत आला होता. दिल्लीतील या कार्यक्रमात सहभागी असलेले लोक वेगवेगळ्या राज्यात परतले होते. (NBSA Rebukes Times Now News 18 and Suvarna for Tablighi Jamaat Coverage)

देशात कोरोनाचा प्रसार व्हायला हे मरकजचं कारणीभूत असल्याचा थेट निर्णयच अनेक वृत्तवाहिन्यांनी देऊ केला होता. देशातील कोरोनाच्या संसर्गासाठी थेट या घटनेला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. वृत्तवाहिन्यांचं हे एकांगी वार्तांकन वास्तवाला धरुन तर नव्हतंच मात्र, त्यात बराच धार्मिक अजेंडा समाविष्ट होता. तशी तक्रारही अनेकांनी केली होती. मात्र, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तक्रारीचा हा सूर फारच क्षीण होता. मरकजला जबाबदार धरुन वृत्तवाहिन्यांकडून मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप तीव्र झाल्यानंतर या प्रकरणाच्या वार्तांकनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

आता या घटनेचं करण्यात आलेल्या वार्तांकनावरून तीन वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याचबरोबर प्रेक्षकांची माफीही मागण्याचा आदेश देण्यात आलं आहे. यामध्ये टाइम्स नाऊ, न्यूज 18 कन्नड आणि सुवर्णा न्यूज या वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटी (National Broadcasting Standards Authority) अर्थात ‘एनबीएसए’ने ही कारवाई केली आहे. Campaign Against Hate Speech (CAHS) यांनी 2020 मध्ये केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय होता हा कार्यक्रम?

दिल्लीमध्ये निझामुद्दीन येथे तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. 13 ते 24 मार्च या दरम्यान निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या साधारण 16,500 लोकांनी भेट दिली होती. त्यानंतर 30 मार्च रोजी हा परिसर सील करण्यात आला होता. कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा ठपका या कार्यक्रमावर ठेवण्यात आल्यानंतर मोठा गहजब निर्माण झाला होता. या साऱ्या घटनेचं वार्तांकन हे धार्मिक विद्वेष कालवणारं तसेच आक्षेपार्ह असल्याचं मत विविध न्यायालयांनी नोंदवलं होतं. त्यानंतरच आता एनबीएसने ही कारवाई केली आहे.

काय म्हटलंय एनबीएसएने?

तबलिगी जमातीविषयी करण्यात आलेलं वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह होतं. ते केवळ अंदाजावर आधारित होतं. वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची भाषा योग्य नव्हती. ती असभ्य होती. त्या वार्तांकनात पूर्वग्रहदूषितपणा होता. या कार्यक्रमातील एकूण भाषेचा स्वर चिथावणीखोर होता. धार्मिक भावनांचा अजिबातच विचार न करता आणि सामाजिक सौहार्दतेची चौकट तोडणारा हा प्रकार होता, असं एनबीएसएने म्हटलं आहे.

या प्रकरणामध्ये, शिक्षा देताना एनबीएसएने न्यूज 18 कन्नड या वृत्तवाहिनीला एक लाख, तर सुवर्ण न्यजू या दुसऱ्या प्रादेशिक वृत्तवाहिनीला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याबरोबरच संबंधित वृत्तवाहिनीने या कार्यक्रमाबद्दल 23 जून रोजी रात्री 9 वाजता प्रसारित केल्या जाणाऱ्या बातमीपत्राच्या अगोदर सर्व प्रेक्षकांची माफी मागण्याचे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला देखील या प्रकरणात दोषी धरण्यात आलं असून दंड ठोठावण्यात आला आहे. या इंग्रजी वृत्तवाहिनीने तबलिगी जमात कार्यक्रमाबद्दल आणि नंतर प्रसारित केलेली दृश्य जुळत नसल्याचंही एनबीएनएने स्पष्टपणे नोंदवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT