ncb destroyed 30 kg drugs 
देश

Amit Shaha : देशात 4 ठिकाणी NCB तीस हजार किलो ड्रग्ज जाळणार, अमित शहा असणार 'साक्षीदार'

एनसीबीच्या पथकांकडून देशातील चार ठिकाणी आज अंमली पदार्थ जाळण्यात येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एनसीबीच्या पथकांकडून देशातील चार ठिकाणी आज अंमली पदार्थ जाळण्यात येणार आहेत.

मादक पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंदीगढला असणार आहेत. दरम्यान, यावेळी एनसीबीच्या पथकांकडून देशातील चार ठिकाणी आज अंमली पदार्थ जाळण्यात येणार आहेत. यावेळी ३० हजार किलोग्रॅमचे अंमली पदार्थ नष्ट केले जाणार असल्याचा माहिती मिळत आहे. (ncb destroyed 30 kg drugs)

या संमेलनादरम्यान दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकात्यात एनसीबीची पथकं ३० हजार किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शाह अंमली पदार्थ नष्ट होताना पाहतील. अंमली पदार्थांविरोधात एनसीबीनं १ जूनपासून धडक कारवाई सुरू केली. एनसीबीनं २९ जुलैपर्यंत ११ राज्यांमध्ये ५१,२१७ किलोपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त केले आहेत.

दरम्यान, आज ३०,४६८ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात येणार आहेत. अंमली पदार्थमुक्त भारताच्या वाटचालीत हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित असतील. त्यांच्यासोबत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि अंमली पदार्थविरोधी यंत्रणांचे अधिकारीही उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एनसीबीनं ७५ हजार किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्याचा संकल्प केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT