Sharad Pawar Supriya Sule  sakal
देश

NCP Action: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरील कारवाईला वेग; सुळेंनी पवारांना लिहिलं पत्र

राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवरही कारवायांना वेग

Amit Ujagare (अमित उजागरे)

Maharashtra Political News : अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे त्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर आज कारवाईला वेग आला आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रीय पातळीवर देखील कारवाईसाठी सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली आहे. याबाबतच पत्र सुळे यांनी पवारांना लिहिलं आहे. (NCP Action Speed up action against Prafull Patel Sunil Tatkare Letter written by Supriya Sule to Sahrad Pawar)

सुळे यांनी पत्रात म्हटलं की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडलं त्यामळं ते अपात्र ठरले आहेत. यानंतर आता माझी शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कारवाई करून पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याप्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत संसद सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची याचिका दाखल करावी. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळेंनी लिहिलेलं सविस्तर पत्र

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांनी देशाची राज्यघटना आणि आपल्या पक्षाच्या नियमांचं उल्लंघन करून पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, हे कळवण्यासाठी मी अत्यंत तातडीने लिहिते आहे. या दोघांनी राजभवन, मलबार हिल्स, मुंबई इथं दुपारी 2:30 वाजता महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून 9 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि नेतृत्व केलं. त्यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे विधाने केली आहेत. पक्षाच्या निर्देशांचे आणि तत्त्वांचे पूर्ण उल्लंघन केले आहे. यापार्श्वभूमीवर तुम्हाला कळविण्यात येते की 2 खासदारांना 9 आमदारांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय पक्षाध्यक्षांच्या परवानगीशिवाय आणि सर्व सदस्यांना विश्वासात न घेता घेतला आहे. (Marathi Tajya Batmya)

पक्षाध्यक्षांच्या माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय हे पक्षांतर अशा छुप्या पद्धतीने केले गेले, ही वस्तुस्थिती पक्षाचा त्याग करण्यासारखे आहे, ज्यामुळं आपोआप अपात्रतेला आमंत्रण मिळते. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, या खासदारांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसची उद्दिष्टे आदर्श वाटत नाहीत. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या घटनेचे आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. त्यांची ही कृती म्हणजे मतदार आणि पक्षाने दिलेल्या जनादेशाचाही थेट विश्वासघात आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की, सक्षम प्राधिकरणासमोर भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रता याचिका दाखल करण्यासह त्यांच्याविरुद्ध त्वरित पावले उचलावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT