sharad pawar
sharad pawar esakal
देश

'या' रणनितीनुसार विरोधक लढणार २०२४ ची निवडणूक? शरद पवारांचे सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रात महाविकास आघडीचे सरकार कोसळले आणि शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत एकजुट दाखवण्याचा सल्ला दिला आहे. येत्या निवडणूकांत किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) अंतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार करू शकतो, असे ते म्हणाले आहेत.

याआधी माध्यमाशी बोलताना शरद पवारांनी म्हटले होते की, जनमत तयार करण्यासाठी बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वयामुळे ते कोणतीही जबाबदारी घेण्यास उत्सुक नाहीत, असे पवार म्हणाले होते.

यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीकी देखील केली होती. अच्छे दिन आणणे, इंटरनेटद्वारे गावे जोडणे आणि प्रत्येक घरात शौचालये, पाणी आणि वीज देणे यासह २०१४ पासून दिलेले एकही आश्वासन पूर्ण करण्यात नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता.

शरद पवार पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अनेक आश्वासने दिली, परंतु त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरकार आपला शब्द पाळण्यात अपयशी ठरले आहे. आता नवीन वचन दिले आहे. 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करणार असल्याचे पवार म्हणाले.

भाजप विरोधकांच्या विरोधात जे काही करत आहे, ते संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याशिवाय दुसरे तिसरे नाही, ही गंभीर चिंतेची बाब आहे. सर्व बिगर भाजपशासित राज्यांमध्ये भगवा पक्ष आमदार फोडून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील ताजी स्थिती ही याचं उदाहरण आहे असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले होते की, छोट्या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा अजेंडा असल्याचे नमूद करून ते म्हणाले, भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी मी फक्त बिगर-भाजप पक्षांना एकत्र आणण्यासाठी मदत करेन, असे ते म्हणाले. मात्र, वयामुळे कोणतीही गंभीर जबाबदारी घेण्यास त्यांनी नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT