sharad pawar and devendra fadanvis 
देश

फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यानंतरच पत्र कसं आलं? शरद पवारांना टायमिंगबाबत शंका

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली. थेट गृहमंत्र्यांवरच खंडणी वसुलीचे आरोप झाले. अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी पत्रात केला होता. याप्रकरणी अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाब वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी या विषयावर भाष्य केलं. अनिल देशमुखांवर गंभीर स्वरुपाचे आरोप पत्राद्वारे करण्यात आले होते, पण त्या पत्रावर परमबीर सिंग यांचे हस्ताक्षर नव्हते, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राच्या टायमिंगबाबत शंका उपस्थित केली आहे. परमबीर यांनी बदली झाल्यानंतरच आरोप का केले, याआधी त्यांना अशा प्रकारचे आरोप का करावे वाटले नाहीत. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यानंतरच हे पत्र कसं आलं? असा सवाल करत पवारांनी यामागे राजकारण असल्याचे सूचित केले आहे. तसेच अशा प्रकरणामुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून सरकार स्थिर असल्याचं ते म्हणाले आहेत. 

राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, अशा प्रयत्नांमुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचं पवार म्हणाले. पत्रकार परिषद घेण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचंही ते म्हणाले. सचिन वाझे यांच्या नियुक्तीचा निर्णय पोलिस आयुक्तालयाकडून घेण्यात आला होता. यामध्ये गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा कोणताही हात नाही. परमबीर सिंi यांनी 100 कोटी कुणाकडे गेले याचा खुलासा पत्रात केला नाही, असंही पवार म्हणाले. 

अनिल देशमुखांबाबतचा निर्णय उद्यापर्यंत; त्यांचं म्हणणंही ऐकूण घेऊ : शरद पवार

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, 'चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. अनिल देशमुखांबाबत निर्णय उद्यापर्यंत घेऊ. त्याआधी सर्वांशी चर्चा केली जाईल. यात गृहमंत्री देशमुख यांचे म्हणणेही ऐकून घेतले जाईल. त्यानंतर सर्वांशी बोलून राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल.' परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. असे असेल तरी अनिल देशमुखांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे याप्रकरणात अनिल देशमुख राजीमाना देतात का हे पाहावं वागणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT