No Confidence Motion sakal
देश

No Confidence Motion: NDAमध्ये फूट? 'हा' पक्ष विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान

मणिपूरच्या परिस्थितीवरुन सुप्रीम कोर्टानंही ताशेरे ओढल्यानं सध्या मोदी सरकार बॅकफूटवर असल्याचं चित्र आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ यायला लागल्या आहेत तसतशी सत्ताधारी NDA आणि विरोधक INDIA मध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावातील भाषणं देखील याची द्योतक आहेत.

दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावरुन सध्या संसदेत चांगलंच घमासान सुरु आहे. याचा फटका NDAला बसताना दिसतो आहे त्याची झलक म्हणजे या एनडीएत फूट पडल्याची स्थिती आहे. कारण या युतीतील एका घटक पक्षानं आपण विरोधकांनी आणलेल्या मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. (NDA Partner MNF Of Mizoram to Back Oppositions No Confidence Motion In Parliament)

लोकसभेचे खासदार सी. लालरोसांगा यांनी ही माहिती दिली आहे. लालरोसांगा हे मिझो नॅशनल फ्रन्ट (MNF) या पक्षाचे खासदार आहेत. हा मिझो नॅशनल फ्रन्ट पक्ष मिझोराममध्ये नॉर्थ इस्ट डेमोक्रेटिक अलायन्सचा (NEDA) भाग आहे. त्याचबरोबर केंद्रातील एनडीएचाही तो घटकपक्ष आहे. (Latest Marathi News)

अविश्वास प्रस्तावाचं का केलंय समर्थन?

मिझो नॅशनल फ्रन्ट हा पक्ष मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा का देणार आहे? याच कारण सांगताना खासदार लालरोसांगा म्हणतात, मणिपूर सरकार आणि शेजारील राज्यांमध्ये जातीय हिंसाचासार रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळं आम्ही सरकारला विरोध करणार आहोत. (Marathi Tajya Batmya)

हिंसाचार रोखण्यात अपयश

लालरोसांगा पुढे म्हणतात, मी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करणार आहे पण याचा अर्थ असा नाही की मी काँग्रेसचं समर्थन करतो आहे आणि भाजपच्याविरोधात जात आहे. पण मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचाराची स्थिती नियंत्रणात आणण्यात केंद्र तसेच राज्य सरकार असमर्थ ठरलं आहे. त्यामुळं याला आपला विरोध दर्शवण्यासाठी मी याचं समर्थन करणार आहे.

बैठकीत घेतला निर्णय

हिंसाचारग्रस्त मणिपूरात जातीय संघर्षाच्या स्थितीमुळं खूपच बिकट स्थितीत आहे. याबाबत मिझो नॅशनल फ्रन्ट पक्षाचे अध्यक्ष जोरमथांगा, मिझोरामचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांसोबत मी चर्चा केली. तसेच अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडं एमएनएफचे राज्यसभेचे खासदार वनलालवेना यांनी कायमच मणिपूरच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. इथल्या परिस्थितीवर तोडगा निघेपर्यंत मी कायम संसदेत आवाज उठवत राहणार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT