Neem Karoli Baba esakal
देश

Neem Karoli Baba : नीम करोली बाबांच्या या गोष्टी ऐकाल तर कायम पैशांनी भरलेला राहील खिसा

विराट कोहलीचे गुरु नीम करोली बाबांच्या या ४ गोष्टी कायम तुमची तिजोरी भरून ठेवेल.

धनश्री भावसार-बगाडे

Neem Karoli Baba Money Tips : नैनिताल येथील कैंची धाम आश्रमातील नीम करोली बाबा जग प्रसिद्ध आहेत. त्यांचे भक्त अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. यात फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अॅप्पलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा समावेश आहे. या दोघांच्या आयुष्यात इतर सामान्य लोकांप्रमाणे समस्या होत्या तेव्हा ते या आश्रमात बाबांच्या दर्शनासाठी आले होते. या शिवाय काही महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा हो सुद्धा दर्शनाला गेले होते.

नीम करोली बाबा यांचा जीवन प्रवास

उत्तर प्रदेशच्या अकबरपूर गावात १९००च्या सुमारास त्यांचा जन्म झाला होता. त्यांच नाव लक्ष्मी नारायण शर्मा होतं. वयाच्या ११ व्या वर्षी एका ब्राह्मण परिवारातल्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. साधू जीवन जगण्यासाठी त्यांनी घर, संसाराचा त्याग केला. पण नंतर वडिलांच्या आग्रहास्तव परत आले. त्यानंतर त्यांना २ मुलं आणि १ मुलगी झाली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कैंची धाममध्ये राहीले.

बाबांचे चमत्कार आणि उपदेश अनेकांना जीवनाची दिशा दाखवणारे ठरले आहेत. त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या इतर कोणाशीही शेअर करू नये. याचे पालन केले तर तुम्ही सुखी जीवन जगू शकतात.

पैसे वापरावे कसे?

बाबा नीम करोली म्हणतात तुमच्याकडे किती जास्त पैसा आहे यावर तुमची श्रीमंती ठरत नाही. ते पैसे कसे वापरावे याविषयी योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्याकडे असलेल्या पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग करणे आणि गरजूंना योग्यवेळी मदत करणे आवश्यक असतो.

योग्य ठिकाणी खर्च

बाबांचं म्हणंण आहे की, जे लोक पैसे योग्य ठिकाणी खर्च करतात, त्यांची तिजोरी कायम भरलेली असते. जमवलेले पैसे कधी ना कधी संपणारच आहेत. त्यामुळे पैसे फक्त साठवू नये तर ते खर्चही करायला हवे. पण ते योग्य ठिकाणी असावे, ज्यामुळे पुन्हा कमवण्यासाठी प्रयत्न व्हावे.

खरा धनवान कोण?

बाबा म्हणतात की ज्या व्यक्तीचं चारित्र्य, वर्तणुक आणि इश्वराची आस्था याने कोष भरलेले असले तर तो व्यक्ता धनवान असतो. अशा व्यक्तीने कधीच स्वतःला गरीब समजू नये. भौतिक गोष्टी नश्वर असतात. माणसाचं खरं धन वर सांगितलेल्या गोष्टी आहेत.

दान धर्म

नीम करोली बाबांनुसार माणसाला आपल्या कमाईतला एक हिस्सा दान धर्मासाठी खर्च करायला हवा. अशा व्यक्तीला कधी इतरांकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पनवेल महापालिका प्रभाग १९ मधील मतदान केंद्रावर गोंधळ; भाजप–महाविकास आघाडी कार्यकर्त्यांत वाद

'गळा दाबला आणि...' ओमकार-विशालमध्ये तुफान हाणामारी, बिग बॉसच्या घरात नुसता राडा, नेटकरी म्हणाले...'डोकं फोडा आणि कॅप्टन व्हा'

Mumbai Municipal Election : मुंबईत ठाकरे ब्रँड, की भाजपचा विस्तार?

Gold Rate Today : सहा दिवसांनी सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; खरेदीची संधी? पाहा तुमच्या शहरातील आजचे भाव

IND vs NZ, Viral Video: विराट कोहलीचा चाहता अचानक मैदानात पळत आला अन् थेट मिठीच मारली, पुढे काय झालं पाहा

SCROLL FOR NEXT