NEET exam frisking Sakal
देश

NEET परिक्षेवेळी मुलींना अंतर्वस्त्र काढायला लावले, 5 महिलांना अटक

सकाळ डिजिटल टीम

NEET exam frisking : केरळमधील कोल्लममध्ये रविवारी NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा देण्यापूर्वी एका विद्यार्थिनीला तिचे अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. केरळ पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पाच महिलांना अटक करण्यात आली आहे.

NEET परीक्षेपूर्वी विद्यार्थिनींची मानहानीकारकरित्या तपासणी केल्याप्रकरणी पोलिसांकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्या विद्यार्थ्याचे आरोप फेटाळले आहेत, विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत सदर घटनेची तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी एका 17 वर्षीय विद्यार्थ्यीनीच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधताना असा आरोप केला की सुरक्षा तपासणीदरम्यान तिच्या ब्राचा मेटॅलिक हुक मधून आवाज आला असल्यामुळे त्यांच्या मुलीला तिची ब्रा काढायला लावली गेली. वडिलांनी सांगितले की त्यांची मुलगी ब्राशिवाय तीन तासांपेक्षा जास्त वेळ बसण्याच्या त्रासदायक अनुभवातून अद्याप सावरलेली नाही. वडिलांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी (विद्यार्थ्यीनीला) सांगितले की, भविष्य किंवा इनवेअर, तुझ्यासाठी काय मोठे आहे? ते काढा आणि आमचा वेळ वाया घालवू नकोस.

या प्रकरणाबाबत 18 जुलैपासून सुरू झालेले आंदोलन मंगळवारी आणखी तीव्र झाले. निषेध मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांच्या एका गटाने कोल्लम जिल्ह्यातील आयुर येथे एका खाजगी शैक्षणिक संस्थेची तोडफोड केली, जिथे मुलीला NEET परीक्षेला बसण्यापूर्वी तिची अंतर्वस्त्रे काढण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थी कार्यकर्त्यांनी पोलिसांचा घेराव तोडला. त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश केला. आणि तोडफोड केली. पोलिसांच्या कारवाईत काही विद्यार्थी कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे.

केरळ महिला आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, प्राप्त झालेल्या दोन तक्रारींच्या आधारे, प्रथमदर्शनी ही महिलांचा अपमान करणारी कृत्ये असल्याचे समोर आले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी परीक्षा आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीलाही या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT