NewBorn_Baby 
देश

Coronavirus Updates: नवजात जुळ्यांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था

बडोदा : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता गुजरातमधील बडोद्यात जुळ्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वडोदरा येथे जुळ्या नवजात बालकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. अतिसार आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्याने या बालकांना जन्मानंतर १५ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी या दोन्ही बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या या बालकांची प्रकृती चांगली आहे, पण त्यांना अजून डिस्चार्ज दिलेला नाही, अशी माहिती एसएसजी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अय्यर यांनी दिली. 

गुरुवारी गुजरातमध्ये दिवसभरात कोरोनाचे २४१० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ३,१०,१०८वर पोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४५२८ एवढी झाली आहे. २०१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत गुजरातमधील २,९२,५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सूरतमध्ये चार, अहमदाबादमध्ये तीन, बडोदा आणि भावनगरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ६२६ रुग्ण आढळले आहेत. सूरतमध्ये ६१५, बडोद्यात ३६३, तर राजकोटमध्ये २२३ नव्या केस नोंदवल्या गेल्या आहेत. 

सध्या गुजरातमध्ये १२,९९६ रुग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी १५५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. ६०,६५,६८२ लोकांनी कोरोनाची लस घेतली असून त्यापैकी ६,९७,२८० जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT