कोरोना टेस्ट Team Esakal
देश

कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला, लागण झाल्यास गंभीर धोका

नामदेव कुंभार

भारतातील कोरोनाची दुसरी लाट हळू-हळू ओसरत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. रविवारी देशात एक लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. ही मागील दोन महिन्यातील सर्वात कमी वाढ होती. रुग्णसंख्या घटत असल्यामुळे दिलासा मिळाला होता पण कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीला (एनआयव्ही) कोरोना विषाणूचा B.1.1.28.2 व्हेरियंट सापडला आहे. ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या दोन जणांमध्ये हा व्हेरियंट आढळून आल्याचं समोर आलं आहे. दोघांमध्ये आढळलेल्या या नव्या व्हेरियंटची जिनोम सिक्वेसिंग आणि परीक्षण करण्यात आले. कोरोनातून बरे होईपर्यंत दोन्ही जणांमध्ये लक्षणे दिसत नव्हती. परंतु यांच्या नमुन्याच्या सिक्वेसिंगनंतर B.1.1.28.2 व्हेरियंट असल्याचे आढळले.

B.1.1.28.2 हा नवीन कोरोन व्हेरियंट भारतात असलेल्या आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. B.1.1.28.2 या नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लागण झालेल्यांना गंभीर आजार होऊ शकतात, असंही समोर आलं आहे. B.1.1.28.2 या व्हेरियंटची उंदरावर चाचणी करण्यात आली. यामध्ये अतिशय गंभीर असे आजार दिसून आले आहेत. यामध्ये वजन घटणं, श्वसन नलिकेत विषाणूची कॉपी तयार होणं, फुफ्फुसाचं अतिशय जास्त नुकसान होणं, यासारखा गंभीर बाबी दिसून आल्या.

B.1.1.28.2 या व्हेरिएंटविरोधात लस प्रभावी ठरू शकते की नाही यासाठी स्क्रिनिंग करण्याची गरज असल्याचं एनआयव्हीनं सांगितलं आहे. B.1.1.28.2 यावर एनआयव्हीनं केलेला अभ्यास bioRxiv मध्ये प्रसिद्ध झाला आहे. पुणे एनआयव्हीनं केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार B.1.1.28.2 व्हेरिएंटविरोधात कोवॅक्सिन प्रभावी आहे. कोवॅक्सिनचे दोन डोस घेतल्यावर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज या व्हेरिएंटला निष्प्रभ करण्यास सक्षम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan : पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण

Ganesh Chaturthi 2025: गणोशोत्सवात गोडधोड खाऊनही स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Manoj Jarange: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक

Video : चुकीचं काम करताना पोलिसांना सापडली; भिऊन महिलेने फाडले स्वतःचेचं कपडे, अश्लीलतेची हद्द पार करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : नागपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT