new motor vehicle act 
देश

छोटीसी चूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स होऊ शकते जप्त; नव्या नियमांमध्ये तरतूद

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन मोटार अधिनियम लागू केला आहे. देशभरात 1 ऑक्टोबरपासून त्याची (New Motor Vehicle Rules) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार आरसी बुक (RC), इन्शूरन्स (Motor Insurance) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सोबत न बाळगता त्याची सॉफ्ट कॉपी सोबत ठेवली तरी चालणार आहे. पण, या नव्या अधिनियमातील तरतुदींनुसार एखाद्या छोट्याशा चुकीमुळं तुमचं लायसन्स जप्त होण्याचीही शक्यता आहे. वाहतूक पोलिस नव्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन, खासगी आणि व्यावसायिक वाहन चालकांवर नजर ठेवणार आहे. 

पोलिसांशी गैरवर्तन नको!
वाहतूक पोलिसांनी एखाद्या वाहन चालकाला पकडल्यानंतर त्या वाहन चालकाचे वर्तन कसे आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. कारण, पोलिसांशी हुज्जत घालणे, गाडी न थांबवणे, अशा प्रकारांवर वाहतूक पोलिस कठोर कारवाई करू शकतात. ट्रक चालकांनी त्यांच्या केबिनमध्ये प्रवाशांना बसवल्यासही दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच दारू पिऊन गाडी चालवणे, गाडी चालवताना सिगारेट ओढणे, हे प्रकारही ड्रायव्हरना महागात पडू शकतात. 

अशी होऊ शकते कारवाई
पोलिसांशी हुज्जत घालण्याऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची कारवाईही या नव्या नियमानुसार होऊ शकते. केवळ लायसन्सच नव्हे तर, गाडीचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्याची कारवाई होण्याचा धोक आहे. व्यावसायिक टॅक्सी किंवा प्रवासी वाहनांमध्ये बुकिंग होऊनही प्रवाशांना घेण्यास नकार, प्रवाशांना चुकीच्या ठिकाणी उतरवणे, बस किंवा वाहनात त्यांच्याशी गैरव्यवहार या तक्रारींवरही कठोर कारवाई होऊ शकते. 

पोलिसांची जबाबदारी वाढली 
पोलिसांना त्यांच्या रोजच्या कामाची किंवा कारवाईची नोंद करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही नोंद कागदावर नसून ती वाहतूक शाखेच्या पोर्टलवर करावी लगाणार आहे. त्यात दंडाची रक्कम, वाहन चालकांवर केलेली कारवाई त्याची कारणे, या सगळ्याचा उल्लेख करावा लागणार आहे. रोजच्या रोज ही नोंद करावी लागणार असल्याने पोलिसांची जबाबदारी वाढलीय. दंड केलेल्या ड्रायव्हरच्या वर्तनाचा उल्लेखही पोलिसांना पोर्टलवर करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wish PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

SCROLL FOR NEXT