New Parliament Building esakal
देश

New Parliament Building : नव्या संसद भवनाच्या जवळपासही हॅकर्स फिरकू शकणार नाही कारण...

संसदेच्या नव्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं आहे.

वैष्णवी कारंजकर

देशाच्या नवीन संसद भवनात अनेक वैशिष्ट्ये आहेत. नवे संसद भवन अत्याधुनिक सायबर प्रणालीनं सुसज्ज आहे. ज्या तज्ञांनी ही प्रणाली तयार केली आहे त्यांनी याला 'अत्याधुनिक' सायबर सुरक्षा असं नाव दिलं आहे. या प्रणालीला 'प्रो अॅक्टिव्ह सायबर सिक्युरिटी' असंही म्हटलं जातं.

चीन, पाकिस्तानसह इतर कोणत्याही देशाचे हॅकर्स नवीन संसद भवनात घुसू शकत नाहीत. इतकंच नाही तर संसद भवनाची सायबर सुरक्षा व्यवस्था इतकी मजबूत आहे की ती सायबर क्राईमच्या डार्क वेबला, ज्याला 'इंटरनेटचे अंडरवर्ल्ड' म्हणूनही ओळखलं जातं, ते या संसदेच्या आयटी प्रणालीच्या जवळपासही जाऊ देणार नाही.

नवीन संसद भवनात फुलप्रूफ सायबर यंत्रणा तयार करणाऱ्या टीममधील सूत्रांचं म्हणणं आहे की, कोणताही हॅकर इथे घुसू शकत नाही. यामुळेच याला 'स्टेट ऑफ आर्ट' म्हटलं गेलं आहे. संसद भवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात 'डिजिटल सर्व्हेलन्स'चा गराडा असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीही मदत घेण्यात आली आहे. दुहेरी सुरक्षा कार्यप्रणाली कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

संसद भवनात एकात्मिक इंटरनेट नेटवर्क व्यतिरिक्त एअर-गॅप्ड संगणक तंत्रज्ञान देखील असेल. एअर गॅप संगणक प्रणालीमुळे डेटाला मालवेअर आणि रॅन्समवेअरपासून संपूर्ण संरक्षण मिळते.याला इंट्रानेटही म्हणतात, म्हणजे उर्वरित नेटवर्कपासून वेगळी प्रणाली. नवीन संसद संकुलातल्या सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (SOC) द्वारे २,५०० इंटरनेट नोड्सच्या उपकरणांचे WiFi द्वारे परीक्षण केलं जाईल. याशिवाय, १,५०० एअरगॅप्ड नोड्स आणि २,००० उपकरणांचे नेटवर्क त्यांच्या कामाचं निरीक्षण करण्यास सक्षम असेल.

देशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र असं असतानाही डेटा ब्रीचच्या घटना घडत आहेत. भाजपची वेबसाईट हॅक झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची वेबसाईटही हॅक करण्यात आली होती. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) देखील सायबर हल्ल्यातून सुटू शकलं नाही. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संगणकांवरही सायबर हल्ला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT