marathi news sangli new born baby found dead  Sakal
देश

आईसमोरच नर्सच्या हातातून नवजात बाळ निसटलं, बालकाचा मृत्यू

नवजात बालकाला टॉवेलनं न गुंडाळता नर्सने बाळाला उचललं होतं

सकाळ डिजिटल टीम

लखनऊच्या खासगी रुग्णालयात नवजात बालक नर्सच्या हातातून निसटल्याने बालकाचा मृत्यू झालाय. डिलिवरी नंतर या बाळाला नर्सने टॉवेलमध्ये न गुंडाळता बाळाला तसंच हातात धरलं होतं, मात्र बाळ नर्सच्या हातातून निसटलं आणि जमिनीवर पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. पण हॉस्पीटल स्टाफने ही घटना लपवण्यासाठी नवजात बाळ मृत जन्मल्याचं कुटूंबियांना सांगितलं होतं. १९ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर नवजात बाळाचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचं समोर आलं. (Newborn died after slipping off from Nurse's arm)

मंगळवारी एका पत्रकाराने पोस्टमार्टम रिपोर्ट बघितल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. लखनऊ पोलिसांनी नर्स आणि हॉस्पिटल स्टाफच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तपास अधिकारी अभिषेक पांडे यांनी मृत नवजात बालकाचं पोस्टमार्टम घटनेच्या दिवशीच झाल्याचं सांगितलं. २० एप्रिल रोजी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बाळाच्या मृत्यूचं कारण समोर आलं.अतिरिक्त पोलिस आयुक्त कासीम सिद्दीकी यांनी हलगर्जीपणामुळे नवजात शिसूचा मृत्यू झाल्याचं सांगितलं,तसेच २४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केल्याची माहीती दिलीय..

मृत बाळाच्या वडील जीवन राजपूत यांनी चिन्हाट पोलिसस्टेशनमध्ये फॉर्मल कम्पलेंट दाखल केली होती. बाळाच्या आईने, आपण बाळाला जिवंत पाहिलं असून नर्सने बाळाला टॉवेलमध्ये न गुंडाळता उचललं होतं, तिच्या हातातून बाळ निसटलं, हे पाहून ओरडताच, स्टाफले तिचं तोंड दाबलं आणि धमकावलं. या घटनेनंतर तिला धक्का बसला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का,जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT