Husband_20wife_20images. 
देश

कोरोनाच्या भीतीने पतीने टाळले शारीरिक संबंध; नववधुने ठोकला नपुंसक असल्याचा दावा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना विषाणूमुळे एकप्रकारच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण कोरोना विषाणूला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी कठोर खबरदारी घेत आहेत. काहींना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने पछाडल्याचं दिसून आलंय. त्याचमुळे ते असाधारण वर्तणूक करत आहेत. अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेशात पाहायला मिळाली आहे. भोपाळमधील एका पतीला पत्नीने घेतलेल्या शंकेमुळे सामर्थ्य चाचणी (potency test) द्यावी लागली आहे. 

कोरोना महामारीमुळे असामान्य आणि अभूतपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शारीरिक अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एका पुरुषाचे 29 जून रोजी लग्न झाले, तेव्हापासून या व्यक्तीने आपल्या पत्नीपासून अंतर ठेवले होते. पतीच्या अशा अजब वागण्यामुळे पत्नी हैराण झाली. तिला आपला पती नंपुसक (impotent man) असल्याची शंका आली. त्यानंतर तिने आपल्या पतीचे घर सोडले आणि ती आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेली. 

भारतात सीरमपूर्वी Pfizer India ची लस येणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

2 डिसेंबर रोजी पत्नीने कायदेशीर मदत घेत, देखभाल भत्त्याची मागणी केली. पती नपुंसक असल्याने तो शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असमर्थ आहे, अशी तक्रार तिने केली. पतीचे घर सोडण्याआधी मी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला, पण योग्य उत्तर मिळाले नाही. माझ्या पुढे अजून खूप आयुष्य आहे. त्यामुळे मी वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे, असे पत्नीने म्हटलं. 

अधिकाऱ्यांनी जेव्हा पतीला यासंबंधी विचारणा केली, तेव्हा मोठा खुलासा झाला. पतीने म्हटलं की, ''कोरोना होण्याच्या भीतीने मी पत्नीशी शारीरिक अंतर ठेवत आहे. आमच्या लग्नानंतर पत्नीच्या आई-वडिलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. माझ्या पत्नीलाही कोरोना झाल्याची मला दाट शक्यता होती. केवळ इम्युनिटी चांगली असल्याने तिच्यात लक्षणे दिसून येत नसल्याचा माजा अंदाज होता. याच भीतीमुळे मी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत.''

चीनची दादागिरी वाढतीये; 'अरुणाचल'मध्ये वसवली 3 गावे 

संवेदनशील प्रकरण निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी पतीला सामर्थ्य चाचणी (potency test) करण्याचा सल्ला दिला. या चाचणीमध्ये पतीचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याला यासंबंधी सर्टिफिकेट देण्यात आले. त्यानंतर पत्नी आपल्या पतीसोबत राहण्यास राजी झाली आणि ती सासरी परत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT