Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi Azad esakal
देश

Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांच बंड फसलं १७ नेते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

रुपेश नामदास

Ghulam Nabi Azad: काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमधील पाच बड्या काँग्रेस नेत्यांनीही पक्षातील आपापल्य पदाचा राजीनामा दिला होता.

मात्र आझाद यांच्या नेतृत्वाखालील डेमॉक्रॅटिक आझाद पक्षाचे राजकीय भवितव्य टांगणीला लागल्याचे दिसत आहे. कारण पक्ष स्थापन झाल्यानंतर निवडणुका होण्याआगोदरच पक्षाला गळती लागली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह १७ माजी काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्येच प्रवेश केला.

यामुळे गुलाम नबी आझाद यांना धक्का बसला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले. केसी वेणुगोपाल म्हणाले, 'भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होण्यापूर्वी आमचे अनेक नेते स्वगृही परतत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

तारा चंद, राज्य काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पीरजादा मोहम्मद आणि अन्य १५ नेते काँग्रेसमध्ये परतले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, येत्या काही दिवसांत डीएपीचे आणखी अनेक नेते काँग्रेसमध्ये परतणार आहेत.

आझाद यांनी ऑगस्टमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यानंतर डीएपीची स्थापना केली. पक्ष स्थापनेनंतर काही आठवड्यांतच त्यात मतभेद सुरू झाले. अलीकडेच तारा चंद आणि अन्य काही नेत्यांची डीएपीतून हकालपट्टी करण्यात आली.

गुलाम नबी आझाद यांचा राजकीय पक्ष फुटला आहे. अनेक नेते एकापाठोपाठ एक आझाद यांच्या पक्षापासून निघून जात आहेत. आता हा राजकीय पक्ष संपुष्टात येताना दिसत आहे.

हेही वाचा-द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

Look Younger: मेकअप आणि सर्जरी न करता त्वचेला तरुण ठेवण्यासाठीचे ५ सोपे मार्ग

Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: "या देशातून आता पुन्हा स्थलांतर होणार नाही"; ओवैसींचा मोदी-शहांवर हल्लाबोल

Mahavitaran : महावितरणकडे आता चॅट बॉटद्वारे तक्रार नोंदवता येणार

SCROLL FOR NEXT