MH-60R  
देश

पुढच्या महिन्यात भारताला मिळणार घातक 'रोमियो'

समुद्राखाली असणाऱ्या पाणबुडीला शोधून मिसाईल हल्ला करण्यास सक्षम

दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारताला अमेरिकेकडून लवकरच घातक 'MH-60R सीहॉक रोमियो' हेलिकॉप्टर्स (Romeos helicopters) मिळणार आहेत. भारताने अमेरिकेबरोबर २४ 'रोमियो' हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला असून त्यातली तीन हेलिकॉप्टर पुढच्या महिन्यापर्यंत भारताला मिळू शकतात. "अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्यांकडे ही हेलिकॉप्टर्स कुठल्या तारखेला सुपूर्द करायची, त्या बद्दल चर्चा सुरु आहे. त्यानंतर ही हेलिकॉप्टर्स भारतात पाठवण्यात येतील". फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. (next month indian navy will get Deadly Romeos helicopters MH-60R)

रोमियो हेलिकॉप्टर्स कशी हाताळायची, त्यासाठी भारतीय नौदलाचे वैमानिक आणि क्रू मेंबर्सचे अमेरिकेत प्रशिक्षण सुरु आहे. हे वैमानिक आणि क्रू मेंबर्स 'MH-60R सीहॉक रोमियो' हेलिकॉप्टर्स घेऊन भारतात परततील. भारत सरकार आणि अमेरिकेमध्ये झालेल्या करारानुसार, ठरलेल्या मुदतीमध्ये या हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी केली जात आहे. परदेशी लष्करी विक्री मार्गाने ही हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार असून २.६ अब्ज डॉलर्सचा हा करार आहे. या हेलिकॉप्टर्समुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची ताकत कैकपटीने वाढणार आहे.

भारतीय नौदलाला काय मिळणार?

करारानुसार, नौदलाला खरेदी पॅकेजतंर्गत हेलिकॉप्टरला लागणार सुट्टे भाग, हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्र आणि वैमानिकासह क्रू मेंबर्सला प्रशिक्षण देण्यात येईल. जे प्रशिक्षण आधीपासूनच अमेरिकेत सुरु आहे.

कोरोना व्हायरसमुळे २०२० मध्ये लॉकडाउन होतं. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम लांबणीवर गेला होता. अनलॉक सुरु झाल्यानंतर नौदलाचे पथक प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले.

काय आहे 'MH-60 रोमियो'चं वैशिष्टय

भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'MH-60 रोमियो' ही चौथ्या पिढीची हेलिकॉप्टर्स आहेत. टॉरपीडोस आणि मिसाइल्सनी ही हेलिकॉप्टर्स सुसज्ज आहेत. समुद्राखाली असणाऱ्या पाणबुडीला शोधून त्यावर मिसाईल हल्ला करण्यासाठी 'MH-60 रोमियो' हेलिकॉप्टर्स सक्षम आहेत.

करारावर स्वाक्षरी झालीय, तेव्हापासून पुढच्या पाचवर्षात भारतीय नौदलाला ही हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. 'MH-60 रोमियो' ब्रिटीश सी किंग हेलिकॉप्टर्सची जागा घेतील. संरक्षण खरेदी परिषदेने २०१८ मध्ये या खरेदीला मंजुरी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT