Mobile-based safety alert system launched under the NHAI–Jio partnership to enhance real-time highway safety for drivers.

 

esakal

देश

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

NHAI–Jio Mobile-Based Safety Alert System : NHAI ने रिलायन्स जिओ सोबत भागीदारी करून मोबाईल-आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टम लाँच केली आहे.

Mayur Ratnaparkhe

road safety system : राष्ट्रीय महामार्गांवर अर्थात हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता तुम्हाला हायवेवरील प्रवास करताना मार्गात येणाऱ्या जीवघेण्या धोक्यांचा अलर्ट आधीच मिळणार आहे. यासाठी NHAI ने रिलायन्स जिओ सोबत भागीदारी करून मोबाईल-आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टम लाँच केली आहे. NHAI च्या मते की हा उपक्रम रस्ता सुरक्षेमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक नवीन मानक स्थापित करेल.

एनएचएआयने सांगितले की, यामुळे वाहनचालकांना एकाच प्लॅटफॉर्मवर रिअल-टाइम रस्त्यांची परिस्थिती, आपत्कालीन मदत आणि अलर्ट मिळतील. सुरूवात पायलट प्रोजेक्टने होईल, ज्यास राष्ट्रीय महामार्गांवर लागू केले पायलट जाईल. यशस्वी चाचणीनंतर,  ही प्रणाली देशभरात सुरू केली जाईल.

या सिस्टमद्वारे, Jio च्या ५० कोटींहून अधिक युजर्सना महामार्गांवर प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता असलेल्या जागा, धुके, भटक्या प्राण्यांचे क्षेत्र आणि अचानक वळवणा बद्दल आगाऊ सूचना मिळतील. यासाठी SMS, WhatsApp आणि हायप्रायरेटी कॉलद्वारे अलर्ट पाठवले जातील. सुरुवातीला, ही प्रणाली काही महामार्गांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू केली जाणार आहे.

NHAI आणि Reliance Jio मधील सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश महामार्ग सुरक्षा मजबूत करणे आहे. Jio चे विस्तृत नेटवर्क प्रवास करताना चालकांना रिअल-टाइम अलर्ट प्रदान करेल, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होईल. ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित असेल आणि महामार्गावरील त्यांच्या स्थानाच्या आधारे Jio युजर्सना संबंधित माहिती पाठवेल.

ही प्रणाली जिओच्या 4G आणि 5G नेटवर्कवर आधारित आहे.  यामुळे महामार्ग वाहतूक व्यवस्थापन मजबूत होण्याची अपेक्षा आहे. ही प्रणाली राजमार्ग यात्रा अॅप आणि हेल्पलाइन 1033 शी जोडली जाईल.

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

Job: एक लाख पगार, काम फक्त खायचं; वजन वाढलं तरी फायदाच! कुठे आहे ही नोकरी?

SCROLL FOR NEXT