NIA Sakal
देश

NIA Raid : ISI-खालिस्तानी दहशतवादी कनेक्शन; NIA च्या रडारवर देशभरातील गँगस्टर

NIA च्या छापेमारीमध्ये प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ठिकाणांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

NIA Raid : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) सोमवारी गँग आणि गुन्हेगारी सिंडिकेटवर कारवाईसाठी देशभरात 60 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ठिकाणांचा समावेश आहे.

एनआयएची ही कारवाई देशभरातील गुंडांच्या अड्ड्यांवर केली जात असून, मुसेवालाच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या तपासात अनेक गँगचे ISI आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर देशभरातील विविध गुंडांच्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे. यामध्ये गोल्डी ब्रारसारख्या गुंडांचा समावेश आहे. ज्याने कॅनडातून सिद्धू मूसेवाला हत्येचे सूत्रसंचालन केले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई टोळी, बंबीहा गँग आणि नीरज बवाना टोळीशी संबंधित असलेल्या 10 गुंडांविरुद्ध प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) दोन एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. एवढेच नव्हे तर, पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आणि दहशतवादी गट आयएसआय यांच्यात जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारसह संदीप उर्फ काला जथेडीचे दहशतवादी कनेक्शनही समोर आले आहे. त्यानंतर देशभरात ही छापेमारी केली जात आहे.

सलमानही होता रडारवर

मूसेवालाच्या हत्येनंतर पोलीस तपासात अटकेतील आरोपीने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हादेखील या टोळाच्या रडावर होता. तसेच त्याच्या हत्येसाठी सलमान्या मुंबईतील घराची रेकीदेखील करण्यात आली होती, असा खुलासा पंजाब पोलिसांनी केला आहे. कपिल पंडितने सांगितले की, तो आणि त्याचे दोन साथीदार रेकी करण्यासाठी मुंबईला गेले होते.

23 जणांना अटक

मूसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली असून, या घटनेत एकूण 35 जणांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये चकमकीदरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या तपासात कपिल पंडितला लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानलाही लक्ष्य करण्यास सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT