young boy esakal
देश

9 वर्षाच्या मुलाकडून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल | Delhi

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निजामुद्दीन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, तेव्हा नऊ वर्षांच्या मुलाने (9 years old boy) चक्क सोशल मिडियावर (social media) अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे समोर आले. मुलाची चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विशेष म्हणजे हा मुलगा शहरातील एका नामांकित शाळेचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पण हे सत्य आहे...

आश्चर्य म्हणजे हे ऐकून विचित्र वाटेल पण हे सत्य आहे, एका नऊ वर्षाच्या मुलाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी निजामुद्दीन पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी मुलाची त्याच्या घरी जाऊन चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण-पूर्व जिल्ह्याच्या डीसीपी ईशा पांडे यांनी याप्रकरणी काहीही सांगण्यास नकार दिला. दिल्ली पोलिसांच्या 'ऑपरेशन मासूम' अंतर्गत ही बाब समोर आली आहे. ऑपरेशन मासूम अंतर्गत आणखी 97 जणांना अटक करण्यात आली आहे.

वडील कमी शिकलेले असल्याचा फायदा मुलाने घेतला.

दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा मुलगा दक्षिण दिल्लीतील एका नामांकित शाळेत शिकतो आणि तो फक्त नऊ वर्षांचा आहे. यासाठी मुलाने वडिलांचा मोबाईल वापरल्याचे सांगितले जात आहे. त्याने ई-मेल आयडी तयार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा अश्लील व्हिडिओ कुठून तरी मुलाकडे आला होता. मुलाचे वडील कमी शिकलेले आहेत. त्यामुळे वडील कमी शिकलेले असल्याचा फायदा मुलाने घेतला. NCMEC या अमेरिकन एनजीओच्या तक्रारीवरून निजामुद्दीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलाची चौकशी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. काही वेळापूर्वी मुलाने हा व्हिडिओ पाठवला होता.

दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) या यूएसस्थित खासगी संस्थेने सोशल मीडियावर केलेल्या निगराणीखाली ही बाब समोर आली आहे. NCMEC ही सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफीवर लक्ष ठेवते आणि अशी प्रकरणे समोर आल्यावर संबंधित देशाला कळवते. NCMEC ने मुलाची बाब NCRB ला सांगितली आणि NCRB ने ही माहिती दिल्ली पोलिसांना दिली. याप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत दिल्ली पोलिस ऑपरेशन मासूम राबवत आहेत. बाल पोर्नोग्राफीपासून संरक्षण करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे IFSO सर्व जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने ऑपरेशन मासूम चालवत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) कडून विशेष सेलच्या IFSC द्वारे बालगुन्हेगारी सामग्रीशी संबंधित उल्लंघनांची माहिती प्राप्त होते. सोशल मीडियावर नजर ठेवणाऱ्या एनसीएमईसी या खासगी संस्थेने एनसीआरबीची माहिती दिली आहे.

NCMEC ने Facebook, Instagram यासह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी करार केला आहे. जेव्हा जेव्हा तिला सोशल मीडियावर मुलांबद्दल कोणतेही अश्लील साहित्य आढळते तेव्हा ती लाल झेंडा लावते. ती त्याचा आयपी अॅड्रेस शोधते आणि मग तो संबंधित देशाला किंवा राज्याला देते. याअंतर्गत दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन मासूम सुरू केले असून ऑपरेशन मासूम अंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विविध पोलिस ठाण्यात 100 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 97 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT