no helmet no petrol esakal
देश

देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरजच नाही - भाजप मंत्री

इंधनाच्या दरवाढीवरुन उत्तर प्रदेशातील मंत्र्याचं अजब विधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : "देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरजच नाही," असं अजब विधान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारला सध्या लोकांचा रोष सहन करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारच्या समर्थनार्थ तिवारी यांनी हे विधान केलं आहे.

तिवारी म्हणाले, जर दरडोई उत्पन्नाची देशातील इंधनाच्या किंमतीशी तुलना केली तर इंधनाचे दर खूप कमी आहेत. "मोजकेच लोक चारचाकी वापरतात आणि त्यांना पेट्रोलची गरज असते. 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नसते. दरम्यान, 100 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस लोकांना मोफत दिले गेले"

देशात आज (गुरुवारी) कोरोना लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला. यानिमित्त केंद्र सरकारचे विविध मंत्र्यांकडून आणि राजकीय व्यक्तींकडून अभिनंदन करण्यात आले. यानिमित्त केंद्रानं गायक कैलाश खेर यांच्या आवाजातील एका थीम सॉंगचं प्रकाशन केलं. दरम्यान, जागतीक आरोग्य संघटनेनंही या विशेष कामगिरीबद्दल भारतीयांचं अभिनंदन केलं आहे.

देशात जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर आज १०० कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर या मोहिमेतील मोठा मैलाचा टप्पाचा पार पडला. यामध्ये पहिला डोस आणि दोन्ही डोस यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT