NITI Aayog Meet Sakal
देश

NITI Aayog Meet: ''2047 पर्यंत भारताला विकसित देश करणार'', नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा निर्धार

NITI आयोगाच्या आठव्या बैठकीसाठी 100 हून अधिक मुद्द्यांवर चर्चा झाली

राहुल शेळके

NITI Aayog Meet: NITI आयोगाची 8वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक दिल्लीत संपन्न झाली. यामध्ये 2047 पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याच्या उद्देशाने आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, जेव्हा राज्ये विकसित होतात, प्रगती करतात तेव्हा भारत पुढे जातो.

त्यांनी राज्य सरकारांना आर्थिक बाबतीत विवेकपूर्ण निर्णय घेण्यास सांगितले जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम प्रभावीपणे राबवू शकतील.

पंतप्रधानांचे हे विधान अनेक राज्यांची जुनी पेन्शन प्रणाली पूर्ववत करण्याच्या आणि मोफत योजना जाहीर करण्याच्या संदर्भात असल्याचे मानले जात आहे.

या बैठकीत भाजपने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन नीती आयोगाच्या बैठकीला गैरहजर राहणारे मुख्यमंत्री “बेजबाबदार” आणि “लोकविरोधी” असल्याचे सांगितले.

NITI आयोगाच्या या बैठकीत, PM मोदींनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

100 हून अधिक मुद्द्यांवर चर्चा:

रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशाच्या विकासासाठी NITI आयोगाची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीत देशाच्या विकासासाठी उद्दिष्टे, आराखडा आणि रोड मॅप तयार केला जातो.

NITI आयोगाच्या आठव्या बैठकीसाठी 100 हून अधिक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, परंतु असे असूनही 11 राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

या बैठकीपासून दूर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, ज्या बैठकीत 100 हून अधिक मुद्द्यांवर चर्चा होणार होती त्या बैठकीत हे मुख्यमंत्री का आले नाहीत.

एवढ्या मोठ्या संख्येने मुख्यमंत्री अशा सभेपासून दूर राहत असतील तर ते आपल्या राज्यातील जनतेचा संदेश केंद्र सरकारपर्यंत कसा पोहोचवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT