CORONA 
देश

तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही धोकादायक! नीती आयोगाचा इशारा

नामदेव कुंभार

तिसऱ्या लाटेत एका दिवसात 4 ते 5 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

covid third wave : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाल्यानंतर बहुतांश राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निती आयोगाने रविवारी केंद्र सरकाराला तसा इशारा दिला आहे. कोरोनाचे संकट (Corona Crisis) अद्याप टळलेले नाही. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेच्या तुलनेत आधिक धोकादायक ठरु शकते, असा इशारा निती आयोगाने केंद्र सरकारला दिला आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी दोन लाख ‘आयसीयू बेड’ (ICU bed) तयार ठेवले पाहिजे,’ असे मत निती आयोगाने व्यक्त केले आहे.

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. ‘‘ सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका जाणवतोय. त्यासाठी गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या सुमारे 20 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल. तिसऱ्या लाटेत एका दिवसात 4 ते 5 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहिजेत. यात व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड असावेत,’ अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

कोरोना संसर्गासाठीच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याचेही रविवारी निती आयोगाने स्पष्ट केले आहे. सध्या तरी जास्तीत जास्त लसीकरणावर सरकारचा भर आहे. तसेच बूस्टर डोसबाबत तज्ज्ञ समितीने अद्याप प्रस्ताव किंवा शिफारस केलेली नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. बूस्टर डोस कधी द्यायचा, याबाबत शास्त्रीय माहितीच्या आधारे संशोधन सुरू आहे.

जगभरात आतापर्यंत डेल्टा (Delta) प्रकारात 13 उत्परिवर्तन (म्युटेशन) (Muteshan) झाले आहेत, त्यापैकी पाच प्रकार भारतात (India) आढळले. देशातील कोरोनाविषयक प्रयोगशाळांच्या संघामध्ये (इन्साकॉग) 72 हजार 931 नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले, त्यापैकी 30 हजार 230 कोरोनाचे गंभीर प्रकार आढळले. यापैकी 20 हजार 324 नमुन्यांमध्ये डेल्टा प्रकार सापडला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकारचे अस्तित्व भारतात सर्वाधिक आहे. त्यामुळे लोक लसीकरणानंतरही संक्रमित होत आहेत. म्हणूनच ‘इन्साकॉग’नेही डेल्टा प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका, यूके आणि चीनसह जगातील 100 हून अधिक देशांमध्ये, डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग पुन्हा वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT