Nitin Gadkari Sakal
देश

विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही - नितीन गडकरी

पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण आपले पोस्टर्स लावणार नाही, जर तुम्हाला मतदान करायचं तर करा नाहीतर नका करू, असंही गडकरी म्हणाले होते.

सकाळ डिजिटल टीम

भाजपाच्या कार्यकारिणीतून पत्ता कट झाल्यापासून नितीन गडकरी वारंवार आपल्या विधानांमुळे चर्चेत येत आहेत. नागपुरात शनिवारी एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. तेव्हाचं त्यांचं विधानही आता चांगलंच चर्चेत आलं आहे. आपल्या विद्यार्थी दशेतला हा किस्सा त्यांनी सांगितला आहे. (Nitin Gadkari in Nagpur)

राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलंय. गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितलं की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही.

नितीन गडकरींनी नुकतंच एक विधान केलं होतं. ज्यात ते म्हणाले होते की, कधीकधी आपल्याला राजकारण सोडण्याची इच्छा होते. कारण आयुष्यात इतरही अनेक गोष्टी आहेत. आजकाल राजकारण सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनण्याऐवजी सत्ताकारणात गुंतत चालले आहे. गडकरी असंही म्हणाले होते की, पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण आपले पोस्टर्स लावणार नाही, कोणाला काही देणार नाही. जर तुम्हाला मतदान करायचं तर करा नाहीतर नका करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशाने VIDEO केला म्हणून वाचला TTE, तिकीट मागताच तरुणीने स्वत:चे कपडे फाडले; धावत्या ट्रेनमध्ये घातला गोंधळ

‘आधी स्वतःकडे पाहा!’ कतरिनाच्या वाढलेल्या वजनाच्या ट्रोलिंगवर अली जाफरचा संतापला, म्हणाला...

IND W vs BAN W: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing XI

Sardesai Wada in Kasba : छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक वाडा पडझडीच्या मार्गावर; मुख्यमंत्र्यांकडे संवर्धनासाठी आर्त हाक

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

SCROLL FOR NEXT