pokhriyal 
देश

जानेवारीत होणाऱ्या CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत केंद्राचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय गेतला आहे. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेशन पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. परीक्षेच्या नव्या तारखांची माहिती लवकरच देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 

केंद्रीय मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. यामध्ये ऑनलाइन शिक्षण, बोर्ड परीक्षा, प्रवेश परीक्षा, मूल्यांकनाचे स्वरुप, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शिक्षणासंबंधी इतर मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. या शिक्षण संवादात देशातील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. शिक्षणाच्या विविध मुद्द्यांवर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय मंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळातही केंद्रीय मंत्र्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि इतरांसोबत वेळोवेळी संवाद साधला आहे. या कठीण काळात सर्वांनाच प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. 

कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आलं. तेव्हा आता परीक्षासुद्धा ऑनलाइन होणार का ? असे विचारले असता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षा ऑफलाइनच होतील असं सांगितलं. कारण अजुनही शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही. अनेक मुलं अशी आहेत ज्यांच्याकडे इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटरची सुविधा नाही. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेणं शक्य नाही. 

बोर्डाच्या परीक्षेआधी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांबाबतही यावेळी विचारलं गेलं. एका शिक्षकाने प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की, मुलांची नवीन पॅटर्नशी ओळख होण्यासाठी काही काळ शाळांमध्ये पूर्व परीक्षेचं आयोजन करता येईल का? यावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं की, परीक्षा फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांचा अतिरिक्त वेळ आधीच मिळाला आहे. यावेळेचा उपयोग करून मुलांना नव्या पॅटर्नची ओळख करून देता येईल. यासाठी पुर्व परीक्षेची गरज नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT