Corona Test sakal
देश

तीन दिवस ताप नसेल, तर कोरोनाची चाचणी नाही

घरी सोडण्याच्या धोरणात बदल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना रुग्णांना(corona patient) रुग्णालयातून घरी सोडण्याबाबतच्या धोरणात मोठा बदल केला आहे. अगदी सौम्य लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप आलेला नसेल त्यांना घरी सोडताना त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केले.(If there is no fever for three days then no corona test)

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना सात दिवसांनंतर घरी सोडण्याची मुभा रुग्णालयांना असेल, असेही केंद्राने स्पष्ट केले. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली व त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले (ऑक्सिजन न लावता सलग ३ दिवस ऑक्सिजन पातळी ९३ च्या वर असेल) तर त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देता येईल, असेही केंद्राने स्पष्ट केले. दरम्यान ,महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ व गुजरात या राज्यांत सध्याच्या लाटेत संक्रमण दर अजूनही जास्त आहे. हा चिंतेचा विषय असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्र, बंगालमुळे काळजी

राष्ट्रीय माध्यम केंद्रात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्र व बंगालमधील वाढीव संक्रमण दर अजूनही कमी होत नाही हे काळजीचे कारण आहे. दोन्ही राज्यांशी केंद्रीय यंत्रणा सातत्याने संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत तो कायम जीवघेणा ठरत नाही, असे जागतिक परिस्थिती सांगते आणि ही दिलासादायक बाब असल्याचे सांगून अग्रवाल म्हणाले, की ओमिक्रॉन संक्रमणामुळे जगभरात आतापावेतो केवळ ११५ जणांनी प्राण गमावले आहेत व तिसरी लाट सुरू झाल्यापासून भारतात केवळ एका जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा

ओमिक्रॉन(omicron) हा अत्यंत वेगाने पसरणारा असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना वारंवार देत आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाने आरोग्य नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करावे. मास्क लावणे व सुरक्षित अंतर पाळणे याबाबत बेपर्वाईने वागून इतरांचे जीव धोक्यात आणू नयेत, असे पुन्हा आवाहन संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT