Journalist Deepak Chaurasia esakal
देश

Gurgaon Court : 'या' बड्या पत्रकाराविरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता!

दीपक चौरसिया न्यायालयात हजर राहणार होते. मात्र, ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

चौरसिया यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितलं की, त्यांना सीएम योगी यांची मुलाखत घ्यायची होती, त्यामुळं ते हजर राहू शकले नाहीत, त्यांनी हे जाणूनबुजून केलेलं नाही.

गुडगावच्या POCSO न्यायालयानं (Gurgaon POCSO Court) टीव्ही पत्रकार दीपक चौरसिया (Journalist Deepak Chaurasia) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय.

चौरसिया यांच्या विरोधात आसाराम लैंगिक अत्याचार प्रकरणात (Asaram Assault Case) 2013 मध्ये 10 वर्षांच्या मुलीचा आणि तिच्या कुटुंबाचा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. हा अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी दीपक चौरसिया न्यायालयात हजर राहणार होते. मात्र, ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. चौरसिया यांच्या वकिलाच्या वतीनं सांगण्यात आलं की, माझ्या अशिलाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासोबत मुलाखत आहे, त्यामुळं ते न्यायालयात येऊ शकत नाहीत. मात्र, असं असतानाही गुरुग्रामचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशी चौहान यांनी चौरसिया यांना कोणताही दिलासा दिला नाही आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं.

दीपक चौरसिया यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती चौरसियांच्या वकिलानं न्यायालयात केली, परंतु न्यायालयानं ते अपील फेटाळलं. दिलेल्या अर्जात चौरसिया किंवा त्यांच्या वकिलाच्या वतीनं कोणतंही प्रतिज्ञापत्र नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय. इतकंच नव्हे तर असा कोणताही पुरावा किंवा कागदपत्रं सादर करण्यात आलेली नाहीत, ज्याच्या आधारे त्यांना सूट मिळू शकेल.

चौरसिया यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितलं की, त्यांना सीएम योगी यांची मुलाखत घ्यायची होती, त्यामुळं ते हजर राहू शकले नाहीत, त्यांनी हे जाणूनबुजून केलेलं नाही. एवढंच नाही तर दीपक चौरसिया यांच्या वकिलानं योगी सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचं पत्रही न्यायालयात सादर केलं. मात्र, या गोपनीय पत्रावर न्यायालयानं म्हटलं की, हे दीपक चौरसिया यांना उद्देशून नाही. हे गुप्त पत्र न्यायालयात सामायिक केलं असता न्यायाधीशांनी सांगितलं की, हे गुप्त पत्र आहे, तुम्ही ते न्यायालयात कसे सादर करू शकता? असा सवाल केला.

दुसरीकडं फिर्यादीच्या वकिलांनी सांगितलं की, दीपक चौरसियांवर गुन्हा दाखल झाला, त्या दिवशीही ते न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यांना जाणीवपूर्वक सुनावणी लांबवायची आहे. चौरसिया यांच्याविरोधात यापूर्वीही वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT