jagannath Puri Temple
jagannath Puri Temple 
देश

जगन्नाथ मंदिराच्या 35 हजार एकर जमिनीची होणार विक्री; ओडीसा सरकारविरोधात असंतोष

सकाळवृत्तसेवा

भुवनेश्वर : ओडीसा सरकारने जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित 35 हजार एकर जमीन विकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. भाजपचे आमदार मोहन मांझींच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कायदा मंत्री प्रताप जेना यांनी 16 मार्चला विधानसभेत म्हटलं होतं की, तत्कालीन राज्यपाल बीडी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या गेलेल्या एका कमिटीच्या शिफारसींनुसार, राज्य सरकार जगन्नाथ मंदिराच्या 35,272.235 एकर जमीनीची संपत्ती विकण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. या निर्णयावरुन सध्या लोकांमध्ये असंतोष आहे. सोशल मीडियावर #SaveJagannathTemple नावाचा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. 

जेना यांनी म्हटलं की, आयोगाच्या शिफारसीनुसार, राज्य सरकारच्या Approved Policy नुसार जमीन विकण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांनुसार, 12 व्या शतकातील या मंदिराच्या 650 कोटी रुपयांच्या कोषाला 2023 पर्यंत वाढवून 1,000 कोटी रुपये बनवण्याचा उद्देश आहे. तसेच त्यांनी  पुढे म्हटलं की, राज्य सरकारने मंदिराच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांकडून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रताप जेना यांनी म्हटलं की ओडीसाच्या 30 मधील 24 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या जगन्नाथ मंदिराशी संबंधित 60,426.943 एकर जमीन आहे. यामधील 395.252 एकर बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये ही जमीन आहे. मंदिर प्रशासन 34,876.983 एकरमध्ये राईट्स ऑफ राईट्स (जमीनीचा अधिकार-RoR) तयार करु शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, जगन्नाथ मंदिराची जास्तीतजास्त 322.930 एकर जमीन पश्चिम बंगालमध्ये, 28.218 एकर जमीन महाराष्ट्रामध्ये, 1.700 जमीन छत्तीसगढमध्ये आणि 0.274 जमीन बिहारमध्ये आहे. ज्या लोकांनी 30 वर्षांपासून अधिक काळापासून मंदिराच्या जमिनीवर ताबा घेतला आहे, त्यांना प्रति एकर 6 लाख रुपये द्यावे लागतील.तर ज्या लोकांनी 30 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त काळापेक्षा ताबा घेतला आहे त्यांना प्रति एकर 9 लाख रुपयांप्रमाणे पैसे द्यावे लागतील. 

315.337 एकर जमिनीची आधीच विक्री
याशिवाय, ज्या लोकांनी 20 वर्षांपेक्षा कमी मात्र 12 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मंदिराच्या जमिनीवर ताबा घेतलाय त्यांना प्रति एकर 15 लाख रुपये भरावे लागतील. राज्य सरकारने कटक शहरातील भारती मठ भवनसहित जगन्नाथ मंदिराची 315.337 एकर जमीनीची आधीच विक्री करुन टाकली आहे. जमिनीच्या विक्रीमधून मिळालेले 11.20 कोटी रुपये मंदिराच्या कॉर्पस फंडात जमा केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT