Orissa Train Accident Esakal
देश

Odisha Train Accident : स्थानिकांनी दाखवलं माणुसकीचं दर्शन, रात्रभर रक्तदानासाठी रुग्णालयात गर्दी; फोटो व्हायरल

या अपघातामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर ९०० हून अधिक लोक जखमी आहेत.

Sudesh

ओडिसामध्ये शुक्रवारी भयानक रेल्वे अपघात झाला. तीन रेल्वेंच्या या अपघातामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सरकारने मृतांचे नातेवाईक आणि जखमी प्रवाशांसाठी मदत जाहीर केली आहे. मात्र, या सगळ्यात स्थानिकांनी वेळीच जखमींना वाचवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न पाहून माणूसकी अजूनही जिवंत असल्याचं दिसून आलं.

सोशल मीडियावर या अपघाताचे कित्येक फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, यासोबतच जखमींच्या मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांचे फोटोही समोर आले आहेत. एका फोटोमध्ये रक्तदान करण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांची रुग्णालयातील गर्दी दिसून येत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो बालासोरजवळील एका रुग्णालयातला आहे. याठिकाणी रक्तदानासाठी स्वतःहून पुढे आलेल्या लोकांची रांग दिसून येत आहे. अनोळखी लोकांच्या मदतीसाठी अगदी मध्यरात्री लोक बाहेर पडले होते. हा फोटो पाहून नेटिझन्स देखील या लोकांचे कौतुक करत आहेत.

बचावकार्य सुरू

दरम्यान, रेल्वे अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी सुमारे २०० रुग्णवाहिका आणि ४५ मोबाईल हेल्थ टीम दाखल झाल्या आहेत. यासोबतच सुमारे ७५ डॉक्टरांचे एक पथक देखील याठिकाणी दाखल होत आहे, अशा माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, बालासोरजवळ झालेल्या या अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, ओडिसा सरकारने शनिवारी दुखवटा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT