Basavaraj Bommai
Basavaraj Bommai esakal
देश

बिपीन रावत यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; CM बोम्मईंचे कारवाईचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला. त्यानंतर या दुखःद घटनेबद्दल काही विकृतांकडून अक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान अशा पोस्ट बद्दल कठोर शब्दात निषेध व्यक्त करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज पोलिसांना पोस्ट करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर काही विकृत वृत्तीच्या काही बेजबाबदार लोकांना ट्विट केले आहेत आणि एक प्रकारे या शोकांतिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याचा प्रत्येक भारतीयाने तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. मी याचा तीव्र निषेध करतो, असे बोम्मई म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशाच्या सशस्त्र दलाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीबाबत बेजबाबदार पणे पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, अशाच प्रकारची कारवाई इतर राज्यांमध्येही करण्यात येत आहे. ज्या लोकांनी असे बेजबाबदार ट्विट किंवा फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत, त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले असून हे निषेधार्ह आणि अक्षम्य आहे. अशा विकृत विचारसरणीचा बंदोबस्त करायला हवा आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे देखील बोम्मई यांनी सांगीतले.

बुधवारी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ MI17 V5 हेलिकॉप्टर कोसळल्याने जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 संरक्षण क्षेत्रातील अधिकारी ठार झाले आहेत. तसेच या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर बेंगळुरू येथील हवाई दलाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT