yogi adityanath Team eSakal
देश

घाबरू नका! ओमिक्रॉन कमकुवत बनलाय - योगी आदित्यनाथ

सूरज यादव

देशातील अनेक राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत १७०० ओमिक्रॉनचे रुग्ण देशात आढळले आहेत.

देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिसऱ्या लाटेची भीती आता गडद होत चालली आहे. असे असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मात्र कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, तसंच ओमिक्रॉन (Omicron) हा कमकुवत असल्याचं म्हटलं आहे. ओमिक्रॉन हा व्हेरिअंट वेगाने पसरणारा आहे. मात्र त्याला घाबरण्याची गरज नाही. त्याची लक्षणे सौम्य आहेत. हा व्हायरस कमकुवत झाला आहे. व्हायरल तापासारखा हा आहे. मात्र काळजी घ्यायला हवी असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, आम्ही एप्रिल २०२१ मध्ये जेव्हा डेल्टा व्हेरिअंट आला तेव्हा पाहिलं होतं की, लोकांना त्याचा संसर्ग झाल्यानंतर १५ ते २० दिवस बरं होण्यासाठी जायचे. या व्हेरिअंटमध्ये उपचारानंतरही अनेक अडचणी येत होत्या. पण ओमिक्रॉनच्या बाबतीत असं काही दिसत नसल्याचंही योगींनी म्हटलं आहे.

देशातील अनेक राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत १७०० ओमिक्रॉनचे रुग्ण देशात आढळले आहेत. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात दर दिवशी सहा ते सात हजार इतके रुग्ण आढळत होते तीच संख्या आज ३३ हजारांवर पोहोचल्यानं चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, देशात लसीकरण मोहिमत आणखी नवा टप्पा भारताने गाठला असून १५ ते १८ वर्षे वयोगटाला लस देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT