Fire
Fire Sakal
देश

नवी दिल्ली : बवाना औद्योगिक परिसरातील आगीत एक ठार, 7 जखमी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसांपासून सुरु असलेल्या आगीच्या (Fire) घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. आजदेखील बवाना औद्योगिक परिसरात लागलेल्या भीषण आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला तर, 6 जण जखमी झाले आहेत. यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Fire Accident In Bawana Industrial Area Of Delhi)

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बवाना इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्याच्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या चेसिसमध्ये (इन्व्हर्टर, स्टॅबिलायझर, एफएम इ.) पहिल्या मजल्यावर आग लागली. या अपघातात 7 जण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एक जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याआधी बुधवारी रोहिणी कोर्ट कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावरील न्यायाधीशांच्या चेंबरजवळ आग लागली होती, त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. तर काही दिवसांपूर्वी मुंडका मेट्रो स्टेशनजवळ भीषण आग लागली होती, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमसीडीच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. तसेच भाजपनेही अमित शहांना पत्र लिहून दिल्लीतील आगीच्या घटनांबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT