Fire and smoke seen after ONGC gas leak in Andhra Pradesh, as emergency teams respond to control the industrial accident.
esakal
ONGC Gas Leak Reported in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात गॅस गळतीची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील राजोलू शहरातील इरुसुमांडा आणि मलिकीपुरम विभागात ओएनजीसी गॅस गळतीमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक ठिकाणी आगीच्या ज्वाळाही उसळल्या आहेत.
जवळपासच्या रहिवाशांनी ओएनजीसी अधिकाऱ्यांना गॅस गळतीची माहिती दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी ओएनजीसी टीमसोबत काम करत आहेत. आगीची घटना समोर आल्यानंतर, परिसर रिकामा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकीपुरम विभागातील इरुसुमांडा गावात गॅस गळती झाल्याची स्थानिकांनी ओएनजीसी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. ओएनजीसी अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह आग विझवत आहेत.
तसेच जवळच्या तीन गावांचा गॅस आणि वीजपुरवठाही खंडित झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ओएनजीसीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक प्रशासनाने सुरक्षेसाठी लाऊडस्पीकरवरून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, गावकऱ्यांना तातडीने घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले. लोक त्यांच्या गुरांसह त्यांच्या शेताकडे पळू लागले आहेत. गॅस गळतीमुळे दृश्यमानताही कमी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.