Coronavirus Vaccine esakal
देश

विदेशवारी करणाऱ्यांना 'बुस्टर' डोसचा अडसर

किरण सूर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : फक्त ६० वर्षापुढील नागरिक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच ‘बुस्टर’ डोस मिळत असल्याने शिक्षण व नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थी व नोकरदारांना ‘बुस्टर’ डोसचा मोठा अडसर निर्माण झाला आहे.

सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरवात केली आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सर्वत्र कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड लसीकरण मोहिम राबविली गेली. त्याअंतर्गत पहिला व दुसरा प्रतिबंधात्मक डोस देण्यात आला. अधिक सुरक्षितता म्हणून दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी तिसऱ्या ‘बुस्टर’ डोसचीही व्यवस्था झाली. मात्र, हा तिसरा ‘बुस्टर’ डोस फक्त ६० वर्षापुढील नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध असल्याने ग्रामीण आदिवासी भागातील शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी व नोकरीनिमित्ताने जाणारे नोकरदार यांना ‘बुस्टर’ डोस देण्यास वैद्यकीय विभागाने असमर्थता दाखविल्याने अनेक विद्यार्थी व नोकरदारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व तरुणांना लवकरच ‘बुस्टर’डोस दिला जाईल, अशी घोषणा शासनाने करूनही बुस्टर डोसच्या शासकीय ऑनलाईन नोंदणीवेळी फक्त ६० वर्षापुढील व्यक्ती व मेडिकल फ्रंटलाईन वर्कर हेच दोन पर्याय संगणक प्रणालीत दिसत असल्याने विद्यार्थी व तरुणांच्या समस्या वाढल्या आहेत. सदर डोस मोबाईल संदेशावरून खासगी रुग्णालयातही उपलब्ध असल्याचे संदेश आलेत.

मात्र, पुणे व मुंबई शहरातील काही खासगी रुग्णालय वगळता इतर शहरातील खासगी रुग्णालयात ही लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थी व नोकरदारांना खासगी रुग्णालयात पैसे देऊन बुस्टर डोससाठी मोठ्या शहरात जाणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सर्वच हेल्पलाईन बंद असल्याचे निदर्शनास आले. संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता हा नंबर अस्तित्वात नाही, असे उत्तर मिळाले. या प्रकाराने पालक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शासकीय रुग्णालय संगणक प्रणालीत परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT