our daughter corona positive the family shouted when the daughter came to court for the wedding at mp 
देश

न्यायालयात ठोकली आरोळी; नवरी कोरोना पॉझिटिव्ह...

वृत्तसंस्था

इंदूर (मध्य प्रदेश): जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान एक प्रेयसी नोंदणी पद्धतीने न्यायालायत विवाह करायला आली होती. यादरम्यान तिचे कुटुंबिय घटनास्थळी दाखल झाले आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची आरोळी ठोकली आणि एकच गोंधळ उडाला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खांडवा येथील न्यायालयात एक मुलगी रजिस्टर पद्धतीने विवाह करण्यासाठी आपल्या प्रियकरासोबत आली होती. दोघांसोबत वकिल आणि मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. मुलीच्या कुटुंबियांचा प्रेमविवाहाला विरोध होता. मुलगी नोंदणी पद्धतीने न्यायालयात विवाह करत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना समजली. विवाह नोंदणीसाठी कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वीच मुलीच्या नातेवाईक जोरात ओरडले. आमची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आले, लग्न थांबवा. यामुळे एकच गोंधळ उडाला. न्यायालयातील वकिलांसह सर्वजण दूर झाले. विवाह करण्यापूर्वी दोघांना कोरोनाची चाचणी करण्याबरोबरच अहवाल आणण्यास सांगितले.

दरम्यान, मुलाचे नातेवाईक घाबरले असून, त्याला क्वारंटाईन करण्यासाठी घेऊन गेले. यामुळे दोघांचा विवाह सध्यातरी थांबला आहे. पण, मुलीच्या कुटुंबियांकडे ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नाही. यामुळे विवाहाची चर्चा परिसरात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT