baba ka dhaba alleged on youtuber gaurav vasan 
देश

'बाबा का ढाबा' फेमस करणाऱ्या यू-ट्यूबर विरोधातच बाबांची पोलिसांत तक्रार; जाणून घ्या कारण

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरातील 'बाबा का ढाबा'चे  मालक कांता प्रसाद मागील काही दिवसांत खूपच प्रसिध्द झाले होते. पण आता ते चर्चेत आले आहेत ते त्यांनी यूट्यूबर गौरव वासन याच्या विरुध्द केलेल्या तक्रारीमुळे. गौरवने लोकांकडून मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रसाद यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपुर्वीच 80 वर्षीय प्रसाद यांचा लॉकडाऊनकाळात व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांचा दुखीः झालेला चेहरा आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन ते प्रसिध्दीच्या झोतात आले होते. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर त्यांच्या लहानशा हॉटेलमध्ये ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. 

याअगोदर यूट्यूबर गौरव वासनने कांता प्रसाद यांचा एक व्हिडिओ केला होता, त्यात प्रसाद यांनी त्यांचा संघर्ष तसेच कोरोनामुळे कमी झालेले ग्राहकसंख्या यामुळे काहीच कमाई होत नसल्याचे सांगितला होता. यानंतर नेटकऱ्यांनी याला मोठ्या प्रमाणात पसरवत बाबा का ढाबा मोठा प्रसिध्द केला होता.  

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव वासन याने केलेल्या प्रसाद यांच्या शेअर व्हिडिओत त्याने प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्या पैशे पाठवण्यासाठी गौरवने त्याचे जवळच्या व्यक्तींचे बॅंक डिटेल्स दिले होते, ज्यावर मदत म्हणून मोठ्या प्रमाणात पैशे पाठवण्यात आले आहेत. तक्रारीत प्रसाद यांनी गौरवने अनेक पैशांचे व्यवहार परस्पर केले आणि ते लपविले असाही आरोप केला आहे.

रविवारी मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार आली असून या प्रकरणाचा तपास पोलिस सध्या करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही,' असे पोलीस अधिकारी अतुलकुमार ठाकूर यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला निवडणूक आयोगाचा दणका, प्रचारगीत नाकारलं; एका शब्दावर आक्षेप

Latest Marathi News Live Update : संभाजीनगर : प्रभाग १६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न

Viral Video : माणुसकी आजही जिवंत आहे ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचंही हृदय भरुन येईल

Education System: भारतात सर्व शाळांमध्ये ऑस्ट्रेलिया पॅटर्न लागू होणार का? जाणून घ्या काय आहे हा पॅटर्न

‘कॉमन सेन्स नाही का?’सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री डेजी शाहच्या शेजारच्या बिल्डिंगला आग, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT