Pahalgam Attack alpine quest map app esakal
देश

Pahalgam Attack : 28 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले 'हे' अ‍ॅप; पहलगामच्या घनदाट जंगलातून दहशतवाद्यांना दाखवली वाट

Pahalgam Attack alpine quest map app : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे अल्पाइन क्वेस्ट अ‍ॅपचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानच्या मदतीने या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.

Saisimran Ghashi

Pahalgam Attack Map App : जम्मू आणि काश्मीरमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळ पहलगामच्या शांत वातावरणाला रक्तरंजित करणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'अल्पाइन क्वेस्ट' नावाच्या अ‍ॅपद्वारे घनदाट जंगलांतून मार्ग शोधून पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार केला होता. या भीषण हल्ल्यात तब्बल २८ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.

टेक्नॉलॉजीचा धोकादायक वापर

तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याची योजना अत्यंत नियोजित आणि तांत्रिक पद्धतीने आखण्यात आली होती. पाकिस्तानच्या लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था ISI यांच्या मदतीने हे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना सीमेपलीकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना अचूक मार्गदर्शन करणारे 'हँडलर्स' पाकिस्तानातूनच त्यांना नियंत्रित करत होते.

'अल्पाइन क्वेस्ट' हे अ‍ॅप सामान्यतः ट्रेकिंगसाठी वापरले जाते. मात्र दहशतवाद्यांनी त्याचा वापर जंगलांमधून अचूक मार्ग शोधण्यासाठी केला. सुरक्षायंत्रणांकडून ट्रॅक होण्याच्या शक्यतेमुळे हे अ‍ॅप एन्क्रिप्टेड स्वरूपात वापरण्यात आले. यामुळे त्यांचे लोकेशन शोधणे सुरुवातीला अत्यंत अवघड ठरले. विशेष म्हणजे हेच अ‍ॅप यापूर्वी जम्मूच्या जंगलात हल्ले घडवून आणण्यासाठी वापरण्यात आले होते.

धर्म विचारून गोळीबार

दहशतवादी बैसरन परिसरात पोहोचल्यावर त्यांनी पर्यटकांना थांबवून त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर थेट गोळ्यांचा वर्षाव केला. ही क्रूर घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठा तपास सुरू केला असून दहशतवाद्यांचा तळ शोधण्यासाठी शोधमोहिमा राबवण्यात येत आहेत.

'द रेझिस्टन्स फ्रंट'चा संशय

या हल्ल्याच्या मागे 'द रेझिस्टन्स फ्रंट' या लष्कर-ए-तैयबा संलग्न संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. ही संघटना 'हिट स्क्वॉड' आणि 'फाल्कन स्क्वॉड' सारख्या घातक युनिट्सचा वापर करत आहे. या पथकांना घनदाट जंगलांत लपण्यासाठी उंच पर्वतरांगेत वावरायला आणि अचानक हल्ले करून पसार होण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला पर्यटन आणि यात्रेवर मोठे सावट आणणारा आहे. यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारकडून सध्या परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला जात आहे आणि सीमेवरील सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्यात येत आहे.

दहशतवादी आता फक्त बंदुका नव्हे तर स्मार्टफोन आणि अ‍ॅप्स वापरून नव्या पद्धतीने भारतात घुसखोरी करत आहेत. त्यामुळे ही केवळ एक घटना नसून भविष्यात होऊ शकणाऱ्या डिजिटल दहशतीचा इशारा मानावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: W,W,W,W! छा गए 'मियां भाई'; Mohammed Siraj ने मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम, WTC मध्ये...

Pune Mastan Baba News : गेली २५ वर्षे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात फिरणारे मस्तान बाबा कोण? शेकडो लोक घेतात दर्शन...

Dussehra Melava 2025 Live Update : सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, थोड्या वेळात भाषणाला सुरुवात

अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा करायचंय लग्न! नवीन इनिंगबद्दल बोलताना म्हणाली...'योग्य जोडीदार...'

ऐकावे ते नवलंच! महिलेने 55 व्या वर्षी दिला 17 व्या मुलाला जन्म; पती म्हणतो, 'उदरनिर्वाहात मोठ्या अडचणी येत आहेत'

SCROLL FOR NEXT