India Pakistan
India Pakistan Sakal
देश

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भूभाग’

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमधील (Kashmir) तथाकथित निवडणुका म्हणजे भारतीय भूभाग (Indias Territory) बेकायदेशीरपणे बळकावण्यावर पांघरूण घालण्याचा आणि या भूप्रदेशात बदल करण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त असून पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग असून तथाकथित सीपीईसीद्वारे (CPEC) त्यामध्ये बदलाचा कोणताही प्रयत्न भारताला मान्य होणार नाही, असेही ठणकावले आहे. (Pakistan Occupied Kashmir is Indias Territory)

परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या निवडणुकांची खिल्ली उडवताना या प्रकाराबद्दल भारत सरकारने पाकिस्तानकडे निषेध नोंदविल्याचे सांगितले. भारतीय भूभागावर पाकिस्तानचा कोणताही अधिकार नसून पाकिस्ताने तातडीने भारतीय भूभागावरील ताबा सोडावा असे आवाहनही त्यांनी केले. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवरूनही (सीपीईसी) बागची यांनी चीन आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावले. अफगाणिस्तानबाबत ते म्हणाले की, तेथील घडामोडींवर भारताचे लक्ष आहे. याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी भारताची भूमिका काल मांडली होती.

चीनशी लष्करी पातळीवर चर्चा

भारत चीन सीमावादावरही बोलताना बागची म्हणाले, की सैन्यमाघार आणि तणाव निवळण्याबाबत भारताने आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. दोन्ही देशांच्या लष्करी पातळीवरील वाटाघाटींचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर कळविले जाईल. या वाटाघाटींसाठी भारतीय आणि चीनी परराष्ट्र मंत्र्यांची सहमती झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

SCROLL FOR NEXT