aamir khan 
देश

‘पांचजन्य’मधून आमीरविरूद्ध ‘शंख’

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - ‘भारतात २०१४ नंतर असहिष्णुता वाढल्याचे सांगणारा बॉलिवूड निर्माता-अभिनेता आमीर खान याला मानवाधिकार हननाबद्दल जगात बदनाम झालेला तुर्कस्तान अत्यंत सहिष्णू देश असल्याचे वाटत असल्यानेच त्याने त्या देशात जाऊन त्यांच्या अध्यक्षांच्या पत्नीच्या भेटीत धन्यता मानली काय?’ असा जळजळीत सवाल ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ऑर्गनायजर’ व ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात आमीर खान याच्या तुर्कस्तानच्या भेटीबाबत तिखट मतप्रदर्शन केले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यावर भारतात असहिष्णुता वाढल्याने आपण भितीपोटी सपत्नीक भारताबाहेर जाण्याच्या विचारात असल्याचे सांगणाऱ्या आमीरने तुर्कस्तान भेट व चिनी उत्पादनांची जाहिरात केली, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मागच्या ५-६ वर्षांत बॉलिवूडपटांमध्ये देशभक्तीची लाट आली व दुसरीकडे येथेच असे काही निर्माते-अभिनेते आहेत ज्यांना आपल्या देशाचे शत्रु चीन व तुर्कस्तान जास्त प्रिय वाटू लागले आहेत.

चीनच्या ‘विवो’चा ब्रॅंड ॲम्बेसेडर असलेला आमीर खान चीनमध्ये जास्त चालतो. त्याचा दंगल तिकडे हिट करविला जातो व त्याच विषयावरील सलमान खानचा ‘सुल्तान’ मात्र चीनमध्ये आपटतो हे का होते ? मुस्लिम जगताचा खलिफा बनण्याच्या धडपडीत असलेल्या तुर्कस्तानने जम्मू-काश्‍मीरवर मुद्यावरून पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला. स्वतःला सेक्‍युलर मानणाऱ्या आमीर खानने त्याच तुर्कस्तानात आगामी चित्रपटाचे चित्रीकरण का ठेवले ? जगात सर्वाधिक पत्रकार ज्या देशात कैदेत आहेत, जेथे मानवाधिकारांचे उल्लंघन सर्वाधिक होते, अशा देशाच्या इशाऱ्यावर आमीर का नाचत आहे? असेही सवाल या लेखात विचारण्यात आले आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: गडकरी प्रमुख पाहुणे असताना स्टेजवर दोन महिला पोस्टमास्टरमध्ये धक्काबुक्की अन् शाब्दीक खटके; नेमकं काय घडलं?

१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

हिमालयातील जीवघेण्या थंडीत सैनिकांनी लढलेल्या युद्धाची शौर्यगाथा ; 120 बहादूरचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस !

'साताऱ्यात बांगलादेशींची घुसखोरी वाढली, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज'; भाजप नेते सोमय्यांनी असा का केला दावा?

Latest Marathi News Live Update : मुंबईत जलद लोकल सेवेवर परिणाम; मेल-एक्सप्रेस उशिरा, भायखळा सिग्नल बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT