Pandav Nagar Murder Mystery Esakal
देश

Pandav Nagar Murder Mystery: पोलिसांनी शोधले 500 फ्रीज, रोज सापडत होते मृतदेहाचे तुकडे...

श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखी आणखी एका घटनेने दिल्लीत खळबळ उडाली

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखी आणखी एका घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आहे दिल्लीतील पांडव नगरचे, जिथे पोलिसांना रामलीला मैदानातून मानवी शरीराचे तुकडे सतत मिळत होते, मात्र ते तुकडे कुठून येत होते हे कळत नव्हते. गुन्हे शाखेने हे प्रकरण हातात घेतल्यानंतर कसुन तपास सुरू केला. तब्बल 5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यात यश आले आहे. यासाठी पोलिसांनी रामलीला मैदानाच्या आजूबाजूच्या घरांमधील फ्रीजची झडती तर घेतलीच, शिवाय आजूबाजूला कुठून तरी कुजण्याचा वास येत आहे का, अशी विचारणाही पोलिसांनी केली होती.

काय प्रकरण आहे?

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी या प्रकरणाचा खुलासा केला. पांडव नगर येथील रामलीला मैदानात सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे अंजन दास यांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो बिहारचा रहिवासी होता. पत्नी पूनम आणि मुलगा दीपक यांनी ही हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनची दीपकच्या पत्नीवर आणि बहिणीवर वाईट नजर होती.अशा स्थितीत दीपक आणि पूनम यांनी अंजनच्या हत्येचा कट रचला. प्रथम अंजनला औषध देण्यात आले. यानंतर त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाचे 10 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. श्रद्धा प्रकरणाप्रमाणेच पूनम आणि दीपक रोज रात्री अंजनच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जात असत.

मिळालेल्या माहीतीनुसार, रामलीला मैदानातून सापडलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांवरून मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. अशा स्थितीत हे प्रकरण उकलण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना जून महिन्यात पांडव नगर येथील रामलीला मैदानात मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांना प्रथम रामलीला मैदानासमोरील ब्लॉक-20 मधील रहिवाशांवर संशय आला. येथे पोलिसांनी घरोघरी जाऊन लोकांच्या फ्रीजची झडती घेतली.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना सीसीटीव्हीवरून मृत अंजन दासची ओळख पटली. मात्र, त्याची पुष्टी होऊ शकली नाही. पोलिसांनी अंजनची चौकशी केली असता तो ५ ते ६ महिन्यांपासून बेपत्ता असून त्याची तक्रारही पोलिसांत नोंदवण्यात आली नसल्याचे समोर आले. अशा स्थितीत पोलिसांनी अंजनची पत्नी आणि मुलाशी संपर्क साधला. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमने अंजनसोबत तिसरे लग्न केले होते. दुसऱ्या लग्नापासून त्यांना तीन मुले झाली. त्याचवेळी अंजनने पूनमसोबत दुसरे लग्न केले. त्याची पहिली पत्नी आणि कुटुंब बिहारमध्ये राहतात. अंजनला पहिल्या लग्नापासून 8 मुले झाली. पूनमला अंजनच्या लग्नाची आणि कुटुंबाची माहिती नव्हती. अंजनने उदरनिर्वाहासाठी कोणतेही कामही केले नाही, त्यामुळे तो पूर्णपणे पूनमवर अवलंबून होता. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी त्याने पूनमचे ​​दागिने विकून बिहारमधील कुटुंबीयांना पैसे पाठवले. यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. यानंतर पूनमचा मुलगा दीपक याचे लग्न झाले. पूनम आणि दीपकच्या पत्नीवर आणि मुलीवर अंजनची घाणेरडी नजर असल्याचा संशय होता. अशा स्थितीत दोघांनी अंजनचा खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT