Jan Adhikar Party Pappu Yadav
Jan Adhikar Party Pappu Yadav esakal
देश

Accident : लग्नाला जात असताना काळाचा घाला; भीषण अपघात पप्पू यादव यांच्यासह अनेक नेते जखमी; कारचा चक्काचूर

सकाळ डिजिटल टीम

बक्सर : आरा-बक्सर राष्ट्रीय महामार्गावर (Ara-Buxar National Highway) मंगळवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे संयोजक पप्पू यादव (Jan Adhikar Party Pappu Yadav) थोडक्यात बचावले.

त्याचवेळी या अपघातात बीएमपीचे 2 कर्मचारी आणि चालकासह एकूण 11 जण जखमी झाले आहेत. माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) आपल्या कार्यकर्त्यांसोबत लग्नाला जात असताना ही घटना घडली.

ब्रह्मपूर पोलीस ठाण्याच्या (Brahmapur Police Station) हद्दीतील देवकुळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रकला ओव्हरटेक केल्यामुळं हा अपघात झाला. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पप्पू यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवानही गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉटची कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला गेली. याशिवाय, या भीषण रस्ता अपघातात पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, चालक, जवान असे 11 जण जखमी झाल्याचं पप्पू यादव यांनी सांगितलं. अपघातात पप्पू यादव यांनाही किरकोळ दुखापत झालीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

Jackfruit Worst Combination : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचे सेवन करणे टाळा, अन्यथा पचनाच्या समस्यांना मिळेल आमंत्रण

Manoj Jarange : पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

Share Market Opening: शेअर बाजार लाल रंगात उघडला; बँक निफ्टी 48,900च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT