corona 1.jpg
corona 1.jpg 
देश

भारतातही सापडले ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण, 6 प्रवासी पॉझिटिव्ह

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- भारतातही ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या सहा रुग्णांमध्ये म्यूटेंट कोरोना विषाणू आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना विलगीकरणात (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या निकटच्या व्यक्तींनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. एकूण 33 हजार प्रवासी इंग्लंडहून भारतातील वेगवेगळ्या विमानतळावर 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत आले होते. यामध्ये 114 जण बाधित आढळून आले. त्यांचे नमुने जेव्हा जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले. तेव्हा त्यात सहा जणांमध्ये नवे स्ट्रेन आढळून आले. यामधील तीन नमुने एनआयएमएचएएनएस, बंगळुरु, 2 सीसीएमबी, हैदराबाद आणि एनआयव्ही-पुणे 1-1 आहेत. दरम्यान, या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील एकही रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

या सर्व रुग्णांवर त्यांच्या राज्यात खास विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचे सहप्रवासी, कुटुंबातील इतर सदस्य आणि संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तींचे कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग केले जात आहे. दुसऱ्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग केले जात आहे. 

नवीन म्युटेंट कोरोना विषाणू असलेल्या स्ट्रेनच्या प्रकरणात आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्वित्झर्लँड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूरसारख्या देशांमधून समोर आले आहेत. सर्वात आधी ब्रिटनमध्ये आढळलेल्या या विषाणूच्या म्यूटेंटचा स्ट्रेन आधीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के जास्त घातक मानला जातो. पहिल्यांदा दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये सप्टेंबरला पहिल्यांदा हा स्ट्रेन आढळून आला होता. 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 20 डिसेंबर रोजी इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन मिळाल्याचे जाहीर केले होते. हा स्ट्रेन आधीच्या कोरोनापेक्षा घातक असल्याचे ते म्हणाले होते. ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ब्रिटनमधील अनेक भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT