paytm
paytm 
देश

‘पेटीएम’-गुगल वादावर पडदा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतातील लाखो जण दैनंदिन व्यवहारात आर्थिक व्यवहारांसाठी ‘पेटीएम’ या ॲपचा वापर करतात. मात्र, गुगलने आज नियमभंगाचे कारण देत हे भारतीय ॲप त्यांच्या प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याने खळबळ उडाली होती. या ॲपच्या एका फिचरमुळे बेटिंगला चालना मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पेटीएमने आरोपाचा इन्कार केला असला तरी त्यांनी संबंधित फिचर काढून टाकल्यानंतर संध्याकाळनंतर त्यांचे ॲप पुन्हा एकदा ‘प्ले स्टोअर’वर दिसून लागले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पेटीएम ही भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली स्टार्टअप कंपनी आहे. भारतात गुगल पे या ॲपला ‘पेटीएम’ची मोठी स्पर्धा आहे. गुगलच्या भारतातील धोरणानुसार, प्ले स्टोअरवर क्रीडा स्पर्धांच्या बेटिंगला प्रोत्साहन देणाऱ्या ॲपला आणि ऑनलाइन कॅसिनोला बंदी आहे. तसेच, एखाद्या ॲपमध्ये दुसऱ्या एका संकेतस्थळाची लिंक देऊन त्या लिंकवरून सशुल्क ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येत असेल आणि त्या माध्यमातून रोख रक्कम जिंकता येत असेल, तर अशा ॲपला प्ले स्टोअरवर परवानगी नाही. ‘पेटीएम’ने त्यांच्या ॲपच्या माध्यमातून काही खेळांचा प्रचार करत प्ले स्टोअरच्या धोरणांचा वारंवार भंग केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘पेटीएम’च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पेटीएम’ने ग्राहकांची क्रिकेटबाबतची आवड लक्षात घेऊन त्यांच्या ॲपवर ‘पेटीएम क्रिकेट लीग’ हे गेमफिचर सुरु केले होते. या गेममध्ये ग्राहकांना प्रत्येक व्यवहारानंतर खेळाडूचे स्टिकर मिळतात आणि त्याद्वारे ग्राहकांना कॅशबॅक मिळते. ‘कॅशबॅकला भारतात कायदेशीर आधार असून आम्ही सर्व नियमांचे पालन करतो. दुर्दैवाने, गुगलला हा त्यांच्या नियमांचा भंग वाटला आणि त्यांनी प्ले स्टोअरवरून ॲप काढून टाकले. आता कॅशबॅक हे फिचर काढून टाकले असून ॲपही पुन्हा एकदा प्ले स्टोअरवर आले आहे,’ असे या प्रवक्त्याने सांगितले. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्यापासून ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बेटिंग होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ॲपपासून दूर राहावे, असा इशाराच गुगलने ‘पेटीएम’च्या निमित्ताने इतर कंपन्यांना दिला आहे. भारतात बेटिंगला कायद्याने बंदी आहे. गुगलने ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ऑनडिमांड व्हिडिओ स्ट्रीमिंग करणाऱ्या कंपनीलाही फँटसी स्पोर्ट्‌स ॲपची जाहीरात करण्यापूर्वी याबाबतचा इशारा द्यावा, अशी सूचना केली आहे. 

तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे. पेटीएम ॲप पुन्हा एकदा प्ले स्टोअरवर आले आहे. आम्ही यूपीआय कॅशबॅक मोहिम आज सकाळपासून सुरु केली होती. याच कारणामुळे गुगलने आमची सेवा बंद करून टाकली होती. भारतीयांनो, आता तुम्हीच ठरवा, कॅशबॅक म्हणजे सट्टेबाजी आहे का? 
- विजयशेखर शर्मा, संस्थापक, पेटीएम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT