supreme court supreme court
देश

पेगॅसस प्रकरण खरं असल्यास आरोप गंभीर- सुप्रीम कोर्ट

कार्तिक पुजारी

पेगॅसस प्रकरणावर (Pegasus spyware scandal) सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचा वापर करुन विरोधक, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

नवी दिल्ली- पेगॅसस प्रकरणावर (Pegasus spyware scandal) सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचा वापर करुन विरोधक, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट (supreme court) म्हणालं की, 'माध्यमातील रिपोर्ट खरे असतील तर आरोप गंभीर आहे'. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठ यावर सुनावणी करत आहे. न्यायमूर्ती सुर्या कांत पीठातील दुसरे न्यायमूर्ती आहेत. (National Latest Marathi News)

कपिल सिब्बल यांनी याप्रकरणाला गंभीर सांगत सुप्रीम कोर्टाला विनंती केली की, याप्रकरणी केंद्र सरकारला नोटिस पाठवली जावी. सुप्रीम कोर्ट आता मंगळवारी याप्रकरणी सुनावणी करणार आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरणात सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आले आहेत. याचिकेमध्ये एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि वरिष्ठ पत्रकार एन. राम आणि शशी कुमार यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने सर्व याचिकाकर्त्यांना म्हटलं की, त्यांनी आपल्या याचिकेची प्रत केंद्र सरकारला द्यावी. सुप्रीम कोर्टात याचिकाकर्ता पत्रकारांकडून वरिष्ठ अधिवक्ता अरविंद दत्तर म्हणाले की, व्यक्तीगत गोपनीयतेच्या स्वरुपात नागरिकांच्या गोपनीयतेचा विचार केला जावा. याप्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, याची स्वतंत्र चौकशी केली जावी. कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाकडे केंद्राला नोटिस पाठवली जावी अशी मागणी केली.

याचिकाकर्ते एन.राम यांची बाजू मांडणारे वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल कोर्टात म्हणाले की, 'हे स्पायवेअर केवळ सरकारी संस्थांनाच विकले जाते. पेगॅसस एक दुष्ट आणि कपटी तंत्रज्ञान आहे. आपल्या परवानगीशिवाय तो आपल्या जीवनात प्रवेश करतो. हे आपल्या लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे.' दरम्यान, भारतातील ३०० लोकांवर इस्त्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भारतात खळबळ उडाली असून संसदेत या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

Ishan Kishan ने इतिहास रचला! अ‍ॅडम गिलख्रिस्टचा मोठा विक्रम मोडला, ठरला जगातील पहिला खेळाडू ज्याने...

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये मतदार याद्यांवर नागरिकांच्या हरकती

Education News : बोगस विद्यार्थी, बोगस अनुदान! शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर, १५ वर्षांनंतर पुन्हा पटपडताळणी

सुरज चव्हाणची लग्नानंतरची गुळणा-गुळणी बघितली का? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT